आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मर्लिन मनरोच्या अखेरच्या आठवणी, पाहा मृत्यूपूर्वीच्या Photoshoot ची झलक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सौंदर्याचा खजिना असलेली हॉलीवूड अभिनेत्री मर्लिन मनरो हिच्या बाबत चाहत्यांना नेहमीच उत्सुकता लागून राहिलेली असते. मर्लिन मनरो म्हटले की, तिचा उडणाऱ्या ड्रेसमधील फोटो असे चित्र लगेचच आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. त्या फोटोमध्ये मर्लिनचे जे सौंदर्य पाहायला मिळाले आहे, त्याने सर्वांनाच घायाळ केले आहे, असे म्हणता येईल. पण ही त्या फोटोची कमाल नाही, तर मर्लिन मनरो ही मुळातच अमाप सौंदर्याचे एक मूर्तिमंत उदाहरण होते. तिच्या प्रत्येक फोटोमधून डोळ्यांना शांतता देणाऱ्या सौंदर्याचे दर्शन व्हायचे. अत्यंत कमी वयात मर्लिन मनरोने जगाचा निरोप घेतला. पण तिच्या आठवणी देणाऱ्या अनेक बाबी ती मागे सोडून गेली. तिची आठवण असलेले असेच काही आजवर समोर न आलेले फोटो आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत. मर्लिनच्या मृत्यूपूर्वीच्या अखेरच्या फोटोशूटमधील हे फोटो आहेत. तिच्या एका पूर्ण न होऊ शकलेल्या अखेरच्या चित्रपटाच्या सेटवरचे हे ऑन लोकेशन फोटो आहेत. एका फेसबूक पेजवर हे फोटो अपलोड केले आहेत. लूक नावाच्या मॅगझिनसाठी 1960 मध्ये हे फोटो क्लिक करण्यात आले होते, असे या पेजवर म्हटले आहे. लॉरेन्स शिल्लप नावाच्या फोटोग्राफरने मर्लिन मनरो हिचे हे फोटो टिपले आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा. मर्लिन मनरोच्या या फोटोशूटचे काही PHOTOS