आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिट सिगर यांचे निधन,‘वुई शल ओव्हरकम’ गाण्यामुळे लोकप्रिय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - ‘वुई शल ओव्हरकम’, ‘व्हेअर हॅव ऑल द फ्लॉवर्स गॉन?’ सारखी गाणी आपल्या आवाजाने अजरामर करणारे महान लोकगायक पीट सिगर यांचे निधन झाले. ते 94 वर्षांचे होते.सिगर यांचे निधन सोमवारी झाले. त्यांचा न्यूयॉर्क हॉस्पिटलमध्ये नैसर्गिक कारणाने मृत्यू झाल्याची माहिती त्यांचे नातू किटामा जॅक्सन यांनी दिली. अमेरिकेसह जगभरातील चळवळीसाठी त्यांची गाणी नेहमीच प्रेरणादायी ठरली. ‘वुई शल ओव्हरकम’ची लोकप्रियता त्या दृष्टीने बरेच काही सांगणारी आहे. राजकीय आणि सांस्कृतिक कार्यकर्ते म्हणून ते जगभरात लोकप्रिय होते. सिगर यांनी भारतात दोन वेळा परफॉर्म केले होते. मी केवळ जगात ‘इच्छा’ऐवजी ‘दृढनिश्चय’ हा शब्द रुजवला. इतकेच माझे गान क्षेत्रातील योगदान आहे, असे सिगर यांनी नेहमीच नम्रपणे सांगितले.
लोकचळवळीचे हत्यार
1919 मध्ये सांगीतिक घराण्यात जन्मलेल्या सिगर यांनी संगीताचा वापर लोकचळवळीचे प्रभावी हत्यार म्हणून केला. सिगर यांनी ‘द युनियन साँग’सारखी गाणीही म्हटली. 1950 च्या दशकात प्रामुख्याने त्यांचा भर कामगार व नागरी हक्कांच्या चळवळीतील गाण्यांवर राहिला.
दिल्लीकर खुश
सिगर यांचा दिल्लीत 12 नोव्हेंबर 1996 रोजी कार्यक्रम झाला होता. एका भरगच्च् प्रेक्षागृहात त्यांनी श्रोत्यांना ठेका धरायला लावला होता. त्यांनी हलक्याफुलक्या विनोदाने हसवलेदेखील होते.