आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

20 छायाचित्रांमध्ये पाहा कसा-कसा बदलत गेला मायकल जॅक्सनचा चेहरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- पॉप स्टार मायकल जॅक्सन)
पॉप स्टार या शीर्षकाला सर्वाधिक प्रसिद्धी ही मायकल जॅक्सनने मिळवून दिली. 'किंग ऑफ पॉप' या नावाने जागतिक किर्ती प्राप्त करणा-या या पॉप स्टारला जगाचा निरोप घेऊन पाच वर्षे उलटून गेली आहेत. 25 जून 2009 रोजी मायकल आपल्या घरात मृतावस्थेत आढळला होता. सिंगिंग आणि डान्सव्यतिरिक्त ज्यासाठी मायकल नेहमी लक्षात राहिल, ती गोष्ट म्हणजे त्याचा बदलत गेलेला चेहरा.

मायकल मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी होती. त्याला आजही त्याच्या नृत्यासाठी विशेषतः मून डान्ससाठी स्मरले जाते. त्याच्या लोकप्रियतेला वादाचीही किनार होती. बेस्ट सेलिंग आर्टिस्टपासून ते बाल लैंगिक छळ, प्लास्टिक सर्जरी आणि आपल्या फॅशनमुळे तो नेहमी चर्चेत राहिला.
मायकल जॅक्सनचे खासगी आयुष्य...
मायकल जॅक्सनने 1994 मध्ये मैरी प्रिंसलेसोबत लग्न केले. मात्र लग्नाच्या 19 महिन्यांतच त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 1997 मध्ये त्याने पुन्हा संसार थाटला. नर्स डेबी रोवसोबत त्याने दुसरे लग्न केले. मात्र लग्नाच्या दोन वर्षांतच त्यांचा संसार मोडला. डेबी आणि जॅक्ससनला दोन मुले असून प्रिन्स आणि पेरिस ही त्यांची नावे आहेत.
मायकलशी निगडीत वाद
लैंगिक छळाचा आरोप - 1987मध्ये त्याची आत्मकथा प्रकाशित झाल्यानंतर त्याच्यावर 11 वर्षीय मुलाचा लैंगिक छळ केल्याचा आरोप लावण्यात आला होता. मायकलने हा आरोप खोटा असल्याचे म्हटले होते. मात्र तरीदेखील या प्रकरणातून सुटका करुन घेण्यासाठी त्याला मुलाच्या आईवडिलांना दोन कोटी अमेरिकन डॉलर द्यावे लागले होते.
पुन्हा झाले असे आरोप - 2003 मध्ये मायकलला पुन्हा एकदा लैंगिक छळ केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याच्यावर पाच महिने कायदेशीर कारवाई चालली. पाच महिन्यांनी त्याच्यावरील आरोप खोटे सिद्ध झाले. त्याकाळात मायकल दिवाळखोर झाल्याच्या बातम्या आल्या होत्या.
प्लास्टिक सर्जरीच्या बातम्यांना नाकारले....
1987 मध्ये बँड अल्बम आल्यानंतर मायकलच्या लोकप्रियतेत भर पडली. मात्र याच काळात त्याने प्लास्टिक सर्जरी करुन घेतल्याचीही चर्चा झाली. त्याचा नवीन लूक बघण्याच्या उत्सुकतेपोटी त्याच्या अल्बमच्या तीन कोटी प्रति विकल्या गेल्या होत्या. अनेकदा चेह-यात बदल करुनसुद्धा मायकलने प्लास्टिक सर्जरी केल्याचे कधीही मान्य केले नाही.
मायकलशी आयुष्याशी निगडीत फॅक्ट्स...
- मायकलने आपल्या करिअरची सुरुवात वयाच्या सातव्या वर्षी केली होती. बौंगो आर्टिस्ट म्हणून त्याने कामाला सुरुवात केली होती.
- 1971 मध्ये सोलो आर्टिस्ट म्हणून करिअरला सुरुवात केली.
- 1980मध्ये मायकल पॉप स्टार बनला होता. Beat it, Billie Jean हे व्हिडिओ ब्लॉकबस्टर ठरले
होते.
- जॅक्सनच्या बेस्ट सेलिंग अल्बम्समध्ये ऑफ द वॉल (1979), थ्रिलर (1982), बैड (1987), डेंजरस (1991) प्रमुख आहेत.
- 13 ग्रॅमी अवॉर्ड्स प्राप्त करणारा मायकल एकमेव कलाकार आहे.
- 1984मध्ये एका शुटिंगदरम्यान मायकल जळाला होता. कॅलिफोर्नियातील ब्रॉटमन मेडिकल सेंटरमध्ये त्याच्यावर अनेक दिवस उपचार चालले. ज्या वॉर्डमध्ये मायकलला दाखल करण्यात आले होते, त्याचे नाव नंतर मायकल जॅक्सन बर्न सेंटर असे ठेवण्यात आले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा मायकलच्या बदलत गेलेल्या चेह-याची छायाचित्रे...