आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमी अवॉर्ड्स: TV इंडस्ट्रीच्या ऑस्करमध्ये प्रियांकाचा जलवा, रेड गाऊनमध्ये दिसला गॉर्जिअस लूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेत्री प्रियांका चोप्राचे बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्येही मोठे नाव आहे. टीव्ही इंडस्ट्रीचे ऑस्कर अवॉर्ड्स म्हणून ओळखल्या जाणा-या ६८ व्या एमी अवॉर्ड्स २०१६च्या सोहळ्यात यावर्षी प्रियांका चोप्रा सहभागी झाली. या अवॉर्ड सोहळ्यात प्रियांकाने जैसन वू यांनी डिझाइन केलेला जार्क रेड कलरचा गाऊन परिधान केला होता. या डिझायनर गाऊनमध्ये प्रियांका अतिशय ग्लॅमरस दिसली. यावेळी तिने नीट पोनीसोबत मिनिमल ज्वेलरी घातली होती. रेड कार्पेटवर अवतरलेली प्रियांका यावेळी सेंटर ऑफ अट्रॅक्शन ठरली.
फोर्ब्स मॅगझिनच्या यादीत आठव्या स्थानावर प्रियांका...
फोर्ब्स मॅगझिनने जगातील सर्वाधिक फीस घेणाऱ्या आणि कमाई करणाऱ्या टीव्ही अॅक्ट्रेसेसची यादी प्रसिद्ध केली आहे. यात 73 कोटींच्या कमाईसह प्रियंका चोप्रा 8 व्या क्रमांकावर आहे. प्रियंका भारतातील पहिली टीव्ही अॅक्ट्रेस आहे, जी जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अॅक्ट्रेसच्या यादीत झळकली आहे.
- फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या यादीत टीव्ही सीरिज 'मॉडर्न फॅमिली'ची कोलंबिया-अमेरिकन अॅक्ट्रेस सोफिया वर्जारा 288 कोटी रुपयांसह (43 मिलियन डॉलर) प्रथम क्रमांकावर आहे.
- दुसऱ्या क्रमांकावर आहे 'द बिग बँग थेअरी'ची अॅक्ट्रेस कॅली कुओका आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे, भारतीय वंशांची 'द मिंडी प्रोजेक्ट' शोची अॅक्ट्रेस मिंडी कॅलिंग.
- बॉलिवूड अभिनेत्री आणि अमेरिकन टीव्ही शो क्वांटिको मध्ये झळकलेली प्रियंका चोप्रा 73 कोटींच्या कमाईसह या यादीत 8 व्या क्रमांकावर आहे.
- प्रियंकाचे गेल्या वर्षी बॉलिवूडमध्ये 'बाजीराव मस्तानी' आणि 'जय गंगाजल' हे चित्रपट प्रदर्शित झाले होते.
- लवकरच प्रियांका हॉलिवूड मुव्ही बेवॉचमध्ये ड्वेन जॉन्सन, पामेला अँडरसन, जॅक एफ्रॉन आणि केली यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. या चित्रपटातून ती हॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे.
- फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या या यादीसाठी अॅक्ट्रेसने जून 2015 ते जून 2016 मध्ये केलेल्या कमाईचा अंतर्भाव आहे.
पुढील स्लाईड्समध्ये बघा, एमी अवॉर्ड्स २०१६ मधील प्रियांका चोप्राचा Stunning Look...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...