आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Priyanka Chopra Wins Favourite Actress Title In People's Choice Award For Quantico

People's Choiceमध्ये प्रियांकाचा बोलबाला, 'क्वांटिको'साठी अवॉर्ड केला आपल्या नावी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः लॉस एंजिलिसमध्ये बुधवारी पार पडलेल्या पीपल्स चॉईस अवॉर्ड्समध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राने फेव्हरेट अॅक्ट्रेसचा अवॉर्ड आपल्या नावी केला. 'क्वांटिको' या टीव्ही सीरिजसाठी तिला हा अवॉर्ड मिळाला. याची माहिती ट्विटरवर देताना प्रियांकाने लिहिले, "I am so fortunate!Thank U to everyone who voted for me at the #PCAs! My #PCManiacs-I am nothing without you!Big love"
हॉलिवूडच्या नावाजलेल्या अभिनेत्रींना मात देत कोरले पुरस्कारावर नाव
फेव्हरेट अॅक्ट्रेसच्या किताबासाठी प्रियांकासह एमा रॉबर्ट्स, जेमी ली कर्टिस, ली मिशेले आणि मर्सिया गे हार्डेन या अभिनेत्रींमध्ये चुरस होती. मात्र हॉलिवूडच्या या अभिनेत्रींना मात देत प्रियांकाने या अवॉर्डवर आपले नाव कोरले. या अवॉर्ड सोहळ्यात प्रियांका फेव्हरेट अॅक्ट्रेस तर जॉन स्टॅमॉसला फेव्हरेट अॅक्टरचा किताब मिळाला. स्टेजवर अवॉर्ड स्वीकारताना प्रियांकाने आपल्या आईला धन्यवाद दिले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, इव्हेंटच्या व्हिडिओसह प्रियांकाची खास छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...