आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Psy's 'Gentleman' Video Smashes YouTube Records With 44 Million Views

‘गंगनम’ची ‘जंटलमन’ स्टाइल, पहिल्याच दिवशी 1 कोटी 80 लाख हिट्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजलिस- ‘गंगनम स्टाइल’ कोरियन रॅपर पीएसवायने पूर्वीप्रमाणेच आपल्या नवीन व्हिडिओद्वारे तरुणांना थिरकवायला लावले आहे. यू-ट्यूबवरील ‘जंटलमन’ या ताज्यातरीन गाण्याने पुन्हा एकदा पीएसवायने धूम केली आहे. 35 वर्षीय पीएसवायने हे गाणे यू-ट्यूबवर अपलोड करताच त्याला पहिल्या दिवशी सुमारे 1 कोटी 80 लाख एवढ्या हिट्स मिळाल्या होत्या. पहिल्या दिवशी हिट्स मिळण्याचा नवा विक्रमही पीएसवायच्या नावावर नोंदवला गेला आहे. गंगनम स्टाइल या गाण्याचा व्हिडिओ अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला होता. त्याला अब्जावधी दर्शक आणि चाहत्यांनी पसंती दर्शवली होती. फ्रान्स, न्यूझीलंड, डेन्मार्क, स्वीडन यांसारख्या अनेक देशांत ‘जंटलमन’ सोमवारी म्युझिक चार्टच्या टॉप टेनमध्ये दाखल झाले आहे.

कसा आहे ‘जंटलमन’ ?
अनेक सुंदरींच्या गराड्यात पीएसवाय अल्बममध्ये पाहायला मिळतो. काही दृश्यांत गांगरलेला पीएसवाय दिसतो. तरुणी त्याच्याशी खट्याळपणे वागताना दाखवण्यात आल्या आहेत.

जस्टिन बिबरला धक्का
किशोरवयीन गायक जस्टिन बिबरचा ‘बॉयफ्रेंड’ व्हिडिओ यू-ट्यूबवर जाहीर होताच चोवीस तासांत पिछाडीवर पडला. ‘जंटलमन’ने त्याला मागे टाकून आघाडी घेतली.

5 कोटी हिट्स केवळ 40 तासांत मिळाल्या.

फिफ्टी वन मिलियन व्ह्यूज इन फोर्टी अवर्स ! माय गॉड.
- पीएसवाय (ट्विटरवरील प्रतिक्रिया)‘गंगनम’ अजूनही टॉप
यू-ट्यूबवर सर्वाधिक पाहिला जाणारा व्हिडिओ म्हणून गंगनम स्टाइलचे स्थान अढळ आहे. या व्हिडिओला 1.5 अब्ज वेळा पाहिले गेले आहे. ही यू-ट्यूबच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. त्यामध्ये त्याने केलेला हॉर्स रायडिंग डान्स प्रचंड लोकप्रिय झाला.

मून यांच्याकडून कौतुक
संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून आणि पीएसवाय हे दक्षिण कोरियाचे आहेत. सार्वजनिक जीवनात अनेक वर्षांपासून असलेल्या मून यांनी पीएसवायबद्दल कौतुकोद्गार काढले होते. पीएसवाय माझ्यापेक्षा अधिक लोकप्रिय असल्याचे ते म्हणाले होते.