आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Queen Elizabeth Will Be In James Bond Next Movie

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेम्स बाँडच्या सिनेमात दिसेल ब्रिटनची ‘महाराणी’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेम्स बाँडच्या आगामी सिनेमात ब्रिटनची महाराणी स्वत: आपली भूमिका साकारणार आहे. प्रसिद्ध हॉलिवूड दिग्दर्शक डॅनी बोयलने एका मुलाखतीत सांगितले की, जेम्स बाँडच्या आगामी सिनेमात आम्हाला राष्ट्रगीताचे एक दृश्य दाखवायचे होते, त्यासाठी आम्ही महाराणीसारख्या दिसणार्‍या हेलेन मिरेन यांना घेतले होते. याची परवानगी घेण्यासाठी आम्ही जेव्हा महाराणीच्या ऑफिसमध्ये पत्र पाठवले तेव्हा तिकडून उत्तर आले की महाराणी स्वत: तेथे उपस्थित राहणार आहेत. वाचून आम्ही आश्चर्यात पडलो होतो. जेव्हा शूटिंग सुरू झाले तेव्हा महाराणी म्हणाल्या की, मला काही संवाद म्हणायचे आहेत का? हो सांगितल्यावर त्यांनी काही संवादसुद्धा म्हटले. आता महाराणीच सिनेमात असल्यामुळे हा सिनेमा यशस्वी ठरेल याची खात्री निर्मात्यांना आहे.