आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेडोनाने कमावली 5 हजार कोटींची संपत्ती, गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आहे नावाची नोंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - गायिका मेडोना)
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा जगप्रसिद्ध अमेरिकन गायिका मेडोनाला आपला आदर्श मानते. प्रियांका चोप्रा इंटरनॅशनल सिंगिंगमध्ये आपले करिअर बनवत आहे. बालपणापासून मेडोनाची चाहती असल्याचे प्रियांकाने एका मुलाखतीत सांगितले होते.
याच निमित्ताने जाणून घेऊया मेडोना का नवोदित गायकांची आदर्श ठरली आहे...
म्युझिक शोमधून कमाई करणा-या गायकांमध्ये मेडोना सर्वात पुढे असल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. तिने मागील दहा वर्षांत अब्जो रुपये कमावले आहेत. म्हणूनच तिला 'क्वीन ऑफ पॉप' म्हटले जाते. गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्मध्ये मेडोनाच्या नावाची नोंद 'बेस्ट सेलिंग फिमेल आर्टिस्ट'च्या रुपात आहे. एका वेबसाइटच्या मते, मेडोनाने मागील दहा वर्षांत जगभरातील विविध शहरांमध्ये अडीचशेहून अधिक शो करुन तब्बल 80 कोटी डॉलर (जवळपास पाच हजार कोटी रुपये)ची कमाई केली आहे. नोव्हेंबर 2013मध्ये फोर्ब्स मॅगझिनने मेडोनाला सर्वाधिक कमाई करणारी गायिका म्हणून संबोधित केले होते. ती आपल्या एका शोसाठी तब्बल वीस कोटींचे मानधन घेते.
मेडोनाचे जगभरात असंख्य चाहते आहेत. शोमधील तिचा डान्स, म्युझिक, लायटिंग, कॉश्च्युम आणि स्टेज सर्वकाही आकर्षणाचे केंद्रबिंदु असतात. आत्तापर्यंत तिच्या शोमध्ये तब्बल 63 लाख लोक सहभागी झाले आहेत.
री-इन्वेंशन वर्ल्ड टूर-2004, कन्फेशन टूर-2006, स्वीट टूर-2008 आणि द एमडीएनए टूर-2012 हे मेडोनाचे सर्वाधित यशस्वी शो आहेत. ‘द एमडीएनए’ या शोमधून तिने जवळजवळ अठराशे कोटींची कमाई केली होती. तिच्या एका शोची किंमत जवळपास अठरा हजार रुपये असते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा पॉप स्टार मेडोनाची इंस्टाग्राम अकाउंटवरुन घेण्यात आलेली खास छायाचित्रे...