आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिहानाने 27व्या वर्षात केले पदार्पण, बघा बर्थडे गर्लचा हटके लूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूडची प्रसिध्द डान्सर आणि गायिका रिहाना आज तिचा 26वा वाढदिवस साजरा करत आहे. रिहानाचे पूर्ण नाव रोबीन रिहाना फेंटी आहे. तिचा जन्म 20 फेब्रुवारी 1988मध्ये बारबाडोसच्या सेंट मायकल येथे झाला. तिच्या आईचे नाव मोनिका फेंटी आणि वडीलांचे नाव रोनाल्ड फेंडी आहे. रिहानाला तीन भाऊ-बहीण आहेत. त्यांच्यामध्ये सर्वात मोठी रिहानाच आहे.
ती 14 वर्षांची असताना तिच्या आई-वडीलांचा घटस्फोट झाला होता तेव्हापासून रिहानाने गाणी गायला सुरूवात केली. तिने वयाच्या 16व्या वर्षी रेकॉर्ड निर्माता इवान रोजर्सच्या मार्गदर्शनाखाली रेकॉर्डिंग करिअरला दमदार सुरूवात केली. 2005मध्ये रिहानाने तिचा अल्बम 'म्यूझिक ऑफ द सन' रिलीज केला. त्यानंतर तिने अनेक हिट अल्बम रिलीज केले आणि त्यांना बरीच लोकप्रियता मिळाली.
रिहानाच्या हटके अंदाजाने तिच्या चाहत्यांची मोठी यादी आहे. सध्या तिचा लूक तरूणींमध्ये ट्रेंड बनत चालला आहे. फोटोशुट आणि तिचा हटके अंदाज तिच्या चाहत्यांना नेहमीच सोशल साइट्सवर पाहायला मिळतो. कारण रिहाना सोशल साइट्सवर सतत अपडेट देत असते. तिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक अवॉर्ड जिंकले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा हटके अंदाजातील रिहानाच्या अदा...