आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

150 जंगली प्राण्यांसोबत 11 वर्ष चालले या चित्रपटाचे शूटिंग, अनेक जण झाले होते जखमी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजिलीस - हॉलिवूड चित्रपट 'रोर'  1980 साली प्रदर्शित झाला होता. त्यावेळी 17 मिलियन डॉलर म्हणजेच 16 कोटी रुपये खर्चून बनलेला होता. जवळपास 150 सिंह, वाघ, जॅग्वार आणि हत्तींसोबत या चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले होते. शूटिंगवोळी जवळपास ७० क्रु मेंबर्स जखमीही झाले होते. ज्यामध्ये अनेक गंभीर जखमीही झाले होते. या चित्रपटाचे शूटिंग जगातील सर्वात धोकादायक शूटिंग समजली जाते. 11 वर्षापर्यंत आपल्या कुटुंबासोबत या जंगली प्राण्यांसोबत राहिला होता चित्रपट दिग्दर्शक..
 
- चित्रपटाची कथा नॉएल मार्शलने लिहीली आहे आणि त्या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि अभिनयही त्यांनी केला आहे. 

- चित्रपटात मार्शलशिवाय त्यांची पत्नी टिप्पी हेडरन, मुलगी मेलनी ग्रिफ्थ, मुलगा जेम्स आणि जेरी यांनी मुख्य भूमिका केली होती. 

- हा चित्रपट बनविण्यासाठी तब्बल ११ वर्षाचा कालावधी लागला होता. 
 
असे जखमी झाले होते चित्रपटाची टीम..
 
- चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जनावरांना कोणत्याच प्रकारे नुकसान झाले नाही पण 70 जखमी झाले होते. त्यात काही गंभीरही होते. 

- एका सिंहाने अचानक केलेल्या हल्ल्यानंतर सिनेमॅटोग्राफर जेन डे बोंटचे डोके फुटले होते. त्याला 220 टाके लागले होते.

- एका हत्तीच्या हल्ल्यानंतर मार्शलची पत्नी टिप्पी हेडरनचा पाय फ्रॅक्चर झाला होता आणि डोक्यालाही मार लागला होता. याशिवाय तिच्या मानेवरही एकदा सिंहाने चावा घेतला.
 
होता. ज्यात 38 टाके पडले होते. ही घटना तुम्ही या चित्रपटातही पाहू शकता. 

- मार्शलची मुलगी मेलनी ग्रिफ्थच्या चेहऱ्यावरही जखम झाली होती. तिला ५० टाके पडले होते.

- मार्शलवरही अनेकदा सिंहाने हल्ला चढविला आहे. एकदा मार्शन पळता पळता पडले होते त्यावेळी एक सिंहाने त्यांच्यावर हल्ला केला. 6 लोकांनी त्या सिंहाला बाजूला केले होते. या 
घटनेनंतर मार्शल यांच्या चेहऱ्यावर 56 टाके पडले होते. 

- मार्शलचा मुलगा जेरीच्या पायालाही सिंहाने चावा घेतला होता. अशाप्रकारे सेटवर अनेक जण जखमी झाले होते. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, काय होती चित्रपटाची कथा, दिग्दर्शकाला कुठून सुचली कल्पना आणि कुठे झाली होती शूटिंग...
बातम्या आणखी आहेत...