आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जॅकी चॅन मृत्यूच्या ऑनलाइन अफवेचे पुन्हा एकदा फुटले पेव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


विख्यात हॉलिवूड अभिनेता जॅकी चॅन मृत्यूच्या ऑनलाइन अफवेचे पुन्हा एकदा पेव फुटले आहे. एका सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान थरारक स्टंट करताना 59 वर्षीय जॅकी चॅनचा मृत्यू झाल्याची बातमी एका वेबसाईटने प्रकाशित केल्यानंतर फेसबूक आणि ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्वर चाहत्यांनी त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी सुरुवात केली आहे. मात्र जॅकी चॅनचा मृत्यू झाला नसून तो ठणठणीत आहे.

तसे पाहता जॅकी चॅनच्या मृत्यूची अफवा पहिल्यांदाच उठली नाहीये. यापूर्वी 21 जूनलासुद्धा जॅकीच्या निधनाची अशीच अफवा सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून पसरली होती. तेव्हा जॅकी चॅनने स्वतःचे एक छायाचित्र प्रकाशित करुन मी जिवंत असल्याचे त्याच्या चाहत्यांना सांगितले होते.