आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जस्टिनसोबत दिसू इच्छित नाही सेलेना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गायिका सेलेना गोमेज पूर्व प्रेमी जस्टिन बीबरसोबत कुठेच दिसू इच्छित नाही. त्यामुळे तिने जस्टिनला त्याच्या येणार्‍या लघुपटातून आपले फुटेज काढायला सांगितले आहे. एका आंतरराष्ट्रीय वेबपोर्टलच्या मते, या वर्षीच्या सुरुवातीलाच सेलेना आणि बीबरचे ब्रेकअप झाले आहे. त्यामुळे बीबरसोबत आपल्या छायाचित्रामुळे गोमेज चिंतेत आहे.
बीबर आपल्या ‘नेव्हर से नेव्हर’च्या थ्रीडी सिनेमात तिचे फोटो घेवू शकतो याची तिला भीती वाटत आहे. सूत्रानुसार जस्टिन लघूपट बनवत असल्याची माहिती जशी गोमेजला मिळाली तसेच तिने त्याला मेसेज करून आपले फोटो न वापरायला सांगितले. खरं तर सेलेना सर्व काही विसरली आहे आणि ती आयुष्यात खूप पुढे गेली आहे.