(पॉप स्टार शकिरा पती जेरार्ड पीक (स्पेनिश फुटबॉलर) आणि आपल्या 17 महिन्यांच्या मुलासह)
पॉप स्टार शकीरा सध्या 'ला ला ला...' या फिफा वर्ल्ड कपच्या आपल्या नवीन गाण्यामुळे चर्चेत आहे. 37 वर्षीय शकीरा या गाण्यात आपल्या जुन्याच अंदाजात दिसत आहे. आई झाल्यानंतरसुद्धा तिच्या काही बदल झालेला नाहीये. शकीराने काही दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबासोबत धमाल मस्ती करतानाची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत.
शकीराने 22 जानेवारी 2013 रोजी मुलगा मिलानला जन्म दिला. मिलान हा शकीरा आणि स्पेनचा स्टार फुटबॉलर जेरार्ड पीके यांचे पहिले अपत्य आहे. आता त्यांचा मुलगा दीड वर्षांचा झाला आहे. शकीराने जेरार्ड आणि मिलानची काही छायाचित्रे फादर्स डेच्या निमित्ताने सोशल मीडियावर शेअर केली होती.
ट्विटरवर अपडेट केले होते रिलेशनशिप...
शकीरा आणि जेरार्ड यांच्या नात्याला 2010 पासून सुरुवात झाली. 2010च्या फिफा वर्ल्ड कपच्या 'वाका वाका' या थीम साँगमध्ये जेरार्डसुद्धा झळकला होता. तेव्हापासून हे दोघे डेट करत होते. अनेकदा मीडियात या दोघांच्या नात्याची चर्चा झाली. 29 मार्च 2011 रोजी शकीराने ट्विटर आणि फेसबूकवर जेरार्डसोबतचे आपले नाते सार्वजनिकरित्या स्विकारले होते.
2012 मध्ये या दाम्पत्याने आईवडील होणार असल्याचे सांगितले होते. जेरार्ड या दिवसांत फिफा वर्ल्ड कप 2014 मध्ये बिझी आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा शकीरा, जेरार्ड आणि मुलगा मिलानची छायाचित्रे....