आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GOOD NEWS : 'वाका वाका गर्ल' शकिराला पुत्ररत्नाची प्राप्ती

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलंबियाची प्रसिद्ध गायिका शकिरा आणि स्पेनचा फुटबॉलपटू जेरार्ड पिक्यू यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता शकिराने मुलाला जन्म दिला. याची माहिती जेरार्ड पिक्यू यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली. शकिरा आणि जेरार्डने आपल्या या लाडक्या मुलाचे नाव 'मिलान' ठेवल्याचे जाहीर केले.

बर्सिलोनातील एका खासगी रुग्णालयात शकिराने बाळाला जन्म दिला. आई आणि बाळाची तब्येत ठणठणीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 35 वर्षीय शकिराने आपण प्रेग्नंट असल्याचे गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केले होते.

पूर्व प्रेमी अँटोनियो डे ला रुआ याच्याबरोबरचे अकरा वर्षांचे प्रेमसंबंध तुटल्यानंतर शकिराचे जेरार्ड पिक्यूबरोबर प्रेम जडले. 2010 मध्ये या दोघांची भेट झाली होती. तेव्हापासून हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे.