आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रमोशनदरम्यान दिसला 'हसिना' श्रद्धाचा Glamours लूक; भाऊ, फॅन्सबरोबर केली मस्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम याची बहीण हसिना पारकरच्या आयुष्यावर आधारित 'हसिना' हा चित्रपट आगामी शुक्रवारी रिलीज होत आहे. चित्रपटामध्ये श्रद्धा कपूर हसिना पारकरची भूमिका करत आहे. या चित्रपटातून श्रद्धा आणि तिचा भाऊ सिद्धांत हे एकत्र काम करत आहेत. चित्रपटाच्या रिलीजच्या पार्श्वभूमीवर सध्या चित्रपटाच्या प्रमोशनला वेग आला आहे. श्रद्धासह चित्रपटाची टीम विविध ठिकाणी जाऊन चित्रपटांचे प्रमोशन करत आहे. नुकतेच 'हसिना'च्या टीमने मुंबईत जुहूतील नोव्हाटेल येथे चित्रपटाचे प्रमोशन केले. यावेळी श्रद्धाचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळाला. प्रमोशनदरम्यान श्रद्धा कपूर भाऊ सिद्धांतबरोबरच फॅन्सबरोबरही मस्ती करताना पाहायला मिळाली. चला तर मग पाहुयात या इव्हेंट्सचे काही क्षण.
पुढील स्लाइड्सवर पाहा, श्रद्धा कपूरचे 'हसिना' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...