आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅसीच्या पहिल्या सिनेमात दिसेल सेलेना गोमेज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गायिका आणि अभिनेत्री सेलेना गोमेज अभिनेता विलियम एच मॅसीच्या दिग्दर्शनात बनत असलेल्या ‘राडरलेस’ या सिनेमात झळकणार आहे.

एका वेबपोर्टलच्या मते, 20 वर्षीय गोमेज या सिनेमात अभिनेता एंटन येलचिन, लॉरेन्स फिशनबर्न आणि बिली क्रूडप यांच्यासोबत काम करणार आहे. या सिनेमात एका अशा व्यक्तीची कथा आहे ज्याला आपल्या मृत मुलाचे लिहिलेले गाणे सापडते. तो आपल्या मुलाच्या सन्मार्थ आपला बँड तयार करतो आणि त्याचे लिहिलेले गाणे म्हणतो. ‘फर्गो’चा अभिनेता मॅसीसुद्धा आपली पत्नी आणि अभिनेत्री फेलिसिटी हफमॅनसोबत सिनेमात दिसणार आहे.