आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ही TV स्टार एका दिवसाला कमावते 61 लाख, फोर्ब्सच्या यादीत तिस-यांदा आहे टॉप वनवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- हॉलिवूड अभिनेत्री सोफिया वेरगारा)
फोर्ब्स मासिकाने सर्वाधिक कमाई करणा-या हॉलिवूड टीव्ही अभिनेत्रींची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर अभिनेत्री सोफिया वेरगाराचे नाव आहे. सोफियाने गेल्या वर्षी 37 मिलियन डॉलर अर्थातच 223 कोटी 51 लाख रुपये इतकी कमाई केली. याचा अर्थ प्रत्येक दिवशी ही अभिनेत्री 61 लाख रुपये कमावत होती. हा आकडा जून 2013 पासून ते जून 2014 पर्यंतचा आहे.
सोफिया गेल्या तीन वर्षांत या यादीत नंबर एकवर आहे. ती टीव्हीसह हॉलिवूड सिनेमांमध्येसुध्दा प्रसिध्द आहे. दुस-या क्रमांकावर टीव्ही अभिनेत्री मरिस्का हार्गिटे (Mariska Hargitay) ही आहे. फोर्ब्सने जी यादी सादर केली आहे त्यामध्ये सर्वाधिक कमाई करणा-या टॉप 10 अभिनेत्री आहेत. त्यांनी एकूण 140 मिलिअन अर्थातच 845 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.
मॉडर्न फॅमिलीने दिली ओळख
42 वर्षीय सोफियाला 'मॉडर्न फॅमिली' या विनोदी मालिकेसाठी ओळखले जाते. या मालिकेमध्ये तिने एमीची भूमिका साकारली होती. या मालिकेत 120 एपिसोडमध्ये ती मुख्य अभिनेत्री होती.
एका एपिसोडचे मानधन 2 कोटी रुपये
मिळालेल्या माहितीनुसार, सोफिया एका एपिसोडसाठी 3 लाख 25 हजार डॉलर (1 कोटी 96 लाख) इतके मानधान घेते. तिची सर्वाधिक कमाई इंडोर्समेन्टमधून होते. ती डायट पेप्सी, कव्हरगर्ल, हेड अँड शोल्डर्सची ब्रँड अॅम्बेसिडर आहे.
फोर्ब्सने सर्वाधिक कमाईक करणा-या अभिनेत्यांचीसुध्दा यादी सादर केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक कमाई करणारा टीव्ही अभिनेता एश्टन कचरचे नाव सामील आहे. कचरने गेल्या वर्षी 26 मिलिअन डॉलर अर्थातच 157 कोटी रुपये कमावले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या फोर्ब्स मासिकाच्या टॉप-10 अभिनेत्रींच्या यादीत कोण-कोण आहे सामील आणि किती आहे त्यांची कमाई...