आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stunning Pictures Of Miss World 2014 Rolene Strauss

Photos: वयाच्या 8 वर्षी रोलेनने बघितले होते \'मिस वर्ल्ड\' होण्याचे स्वप्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मिस वर्ल्ड रोलेन स्ट्रॉस)
दक्षिण आफ्रिकेच्या 22 वर्षाच्या रोलेन स्ट्रॉस या सौंदर्यवतीने मिस वर्ल्ड 2014 चा किताब पटकावला. 2013 मध्ये मिस वर्ल्ड ठरलेल्या फिलिपिन्सच्या मेगॉन यंगने रोलेनला मिस वर्ल्डचा मुकूट घातला. हा किताब आपल्या नावी केल्यानंतर रोलेनने म्हटले, की हा किताब माझ्या देशासाठी आहे. भविष्यात शिक्षण क्षेत्रात काम करणार असल्याचे रोलेन म्हणाली.
मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावी करणारी रोलेन दक्षिण आफ्रिकेतील तिसरी सौंदर्यवती आहे. यापूर्वी 1958 आणि 1974मध्ये दक्षिण आफ्रिकेतील सौंदर्यवतींनी हा किताब आपल्या नावी केला होता.
वयाच्या आठव्या वर्षी पाहिले होते स्वप्न...
रोलेनने वयाच्या आठव्या वर्षी मिस वर्ल्ड होण्याचे स्वप्न पाहिले होते. 15 वर्षांची असताना रोलेनने मॉडेल लूक इंटरनॅशनलचा किताब आपल्या नावी केला होता. इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर तिची अनेक ग्लॅमरस छायाचित्रे उपलब्ध असून त्यामध्ये तिचे सौंदर्य स्पष्ट झळकतं.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा रोलेनची सोशल अकाउंटवरुन घेतलेली खास छायाचित्रे...