आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यास मिला उत्सुक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोल्डन ग्लोब नॉमिनेटेड अभिनेत्री मिला कुनिस आता आपल्या आगामी सिनेमातून लोकांना घाबरवणार आहे. डिज्नीच्या ‘ऑज: द ग्रेड अँड पॉवरफुल’ या सिनेमात ती एका थियोडोराची भूमिका करणार आहे. थियोडोरा म्हणजे पृथ्वीवरील हडळ. एल. फ्रेंक बोम यांच्या पुस्तकात दाखवण्यात आलेल्या जादूई पात्रावर आधारित डिज्नीच्या विलक्षण अँडव्हेंचर सिनेमाचे दिग्दर्शन सॅम रेमीने केले आहे. भारतात हा सिनेमा 8 मार्च रोजी रिलीज होणार आहे. सिनेमा आणि भारताविषयी मिलाशी झालेला संवाद-

या सिनेमात काम करण्याचे काही खास कारण ?

सगळ्यात मोठे कारण म्हणजे हा सिनेमा सॅम रॅमी यांनी बनवला आहे, त्यामुळे त्यांच्या सिनेमात काम करण्याची इच्छा होतीच. दुसरे म्हणजे सुरुवातीला मी या भूमिकेसाठी तयार नव्हते आणि कथानक वाचल्यावर तर नक्कीच ही भूमिका करू शकणार नाही, असे वाटले होते. मात्र, जेव्हा सॅम यांना भेटले तेव्हा मी या भूमिकेवर मोकळी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मला खूप समजावून सांगितले, त्यानंतर मी तयार झाले.

तुला भारतात येणे आवडेल का?

हो नक्कीच, मी भारताविषयी खूप काही ऐकले आहे. समृद्ध संस्कृतीसाठी भारत ओळखला जातो. तेथे राहून तेथील संस्कृती समजून घ्यायची आहे. तेथील काही धार्मिक स्थळांना भेट देण्याची माझी इच्छा आहे. दिल्लीसह इतर शहरांतही मी जाईल. भारतातील पेहराव मला खूप आवडतो. खास करून मला साड्या खूप आवडतात. मी सर्वप्रथम आल्यावर साड्या विकत घेईल. माझ्या मते, स्त्रिया साडीत चांगल्या दिसतात.

बॉलिवूडमधील आवडते कलाकार कोणते आहेत?

मी बॉलिवूडचे जास्त चित्रपट पाहिले नाहीत. मला ‘देवदास’ थोडाथोडा आठवतो. ऐश्वर्या त्यात खूप सुंदर दिसली होती. मला वाटते की ती खरंच खूप सुंदर आहे.

बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा आहे का?

व्वा का नाही, जर असे झाले तर खूप मजा येईल. माझ्या मते, इंडियन सिनेमातत खूप वैविध्य आहे. वेगवेगळ्या भूमिकेत आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल.