आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉलिवूड अभिनेता एनटॉनचा अपघातात मृत्यू, विधु विनोद चोप्रासोबत केले होते काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा अपघात सॅन फर्नांडोमध्ये त्याच्या घरी शनिवारी (18 जून) रात्री झाला. त्याची कार गेटला धडकली. (फाइल) - Divya Marathi
हा अपघात सॅन फर्नांडोमध्ये त्याच्या घरी शनिवारी (18 जून) रात्री झाला. त्याची कार गेटला धडकली. (फाइल)
सॅन फर्नांडो (अमेरिका): 'स्टार ट्रॅक' सीरीजचा हॉलिवूड अभिनेता एनटॉन येलचिनचा कार अपघातात मृत्यू झाला. तो 27 वर्षांचा होता. हा अपघात त्याच्या घराजवळ झाला. त्याने सिनेमांपूर्वी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून करिअरला सुरुवात केली होती. येलचिन विधु विनोद चोप्रा यांच्या 'ब्रोकन हॉर्सेस' या हॉलिवूड सिनेमात झळकला होता.
कधी समोर आली निधनाची वार्ता...
- हा अपघात सॅन फर्नांडोमध्ये त्याच्या घरी शनिवारी रात्री झाला.
- त्याला शनिवारी रात्री एका सरावामध्ये सामील व्हायचे होते. परंतु जेव्हा तो तिथे पोहोचू शकला नाही तेव्हा त्याच्याविषयी चौकशी सुरु झाली.
- त्याचा मित्र शनिवारी रात्री 1 वाजता त्याच्या घरी गेला तेव्हा येलचिन गेटजवळ कारमध्ये अडकलेला दिसला.
- पोलिसांच्या सांगण्यानुसार, 'अद्याप अपघाताचे कारण माहित होऊ शकले नाहीये.'
- त्याचा मृत्यू कार हिट केल्याने झाला आहे.
क्रेजी', 'अल्‍फा डॉग सिनेमांत केले काम...
- एनटॉनने क्रेजी', 'अल्‍फा डॉग सह अनेक सिनेमांत काम केले होते.
- स्टार ट्रॅक त्याच्या करिअरचा टर्निंग पॉइंट होता. यात त्याला चांगली भूमिका मिळाली होती.
- या सीरिजचा तिसरा सिनेमा जुलैमध्ये रिलीज होणार आहे.
हॉलिवूडमध्ये शोकाकुल...
- एनटॉनच्या मृत्यूने हॉलिवूडमध्ये शोकाकुल वातावरण झाले आहे.
- स्टार ट्रॅकचा को-स्टार जॉन चोने पोस्ट केले, 'मी एनटॉनवर खूप प्रेम करत होतो. तो चांगला कलाकार होता.तो हँडसम आणि धाडसी होता.'
- तसेच निर्माता मेकर केव्हिन स्मिथने एनटॉनच्या निधनाला इंडस्ट्रीचे नुकसान झाल्याचे सांगितले.
विधु विनोद चोप्राच्या सिनेमात केले होते काम...
- एनटॉन येलचिनने विधु विनोद चोप्राच्या 'ब्रोकन हॉर्सेस' या हॉलिवूड सिनेमात काम केले होते.
- या सिनेमात 'द जज', 'मेन इन ब्‍लैक', 'जॅकेट'सारख्या हिट सिनेमांचा अभिनेता विनसेंट डि‍' ओनोफ्रियो, मारिया वेलवर्देशिवाय थॉमस जेन, सीन पॅट्रिक आणि क्रिस मार्क्वेटनेसुध्दा काम केले होते. हा सिनेमा 2015मध्ये रिलीज झाला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा एनटॉनचा ट्रॅक सिनेमातील सीन...
बातम्या आणखी आहेत...