आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : जाणून घ्या 'हॅरी पॉटर'च्या लेखिकेची कथा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॅरी पॉटर मालिकेच्या लेखिका जे. के. रोलिंग दुसर्‍या नावाने गुन्हेगारी कथा ‘कुकूज कॉलिंग’ लिहून पुन्हा चर्चेत आहेत. कुकूज कॉलिंगच्या लेखिका जे. के. रोलिंग याच असल्याचा खुलासा झाल्यापासून पुस्तकाची विक्री वाढली आहे.

1964 मधील एक रम्य दिवस. इंग्लंडमधील किंग्ज क्रॉस स्टेशन. एअरक्राफ्ट इंजिनिअर पीटर जेम्स आणि एनीची भेट येथून सुटलेल्या एका रेल्वेगाडीतून झाली. नंतर ते दोघे एकमेकांच्या जीवनाचा भाग झाले. 14 मार्च 1965 रोजी त्यांनी लग्न केले. 31 जुलै 1965 रोजी त्यांच्या घरी पहिली मुलगी जोएनी रोलिंगचा जन्म झाला. ज्याला सर्वजण प्रेमाने ‘जो’ म्हणून बोलवत. लहानपणापासूनच रोलिंगला कथा सांगणे आणि लिहिणे आवडत होते. आपल्या लहान बहिणीला त्या नेहमी गोष्टी सांगत. रोलिंगची पहिली गोष्ट होती ‘रॅबिट.’ त्यावेळी त्यांचे वय होते अवघे सहा वर्षे. सशाच्या बिळात रोलिंग कशा प्रवेश करतात आणि तेथे सशाच्या परिवाराने गोळा केलेल्या स्ट्रॉबेरीज नष्ट करतात अशा आशयाची ती कथा होती. त्यानंतर रोलिंगनी अनेक काल्पनिक कथा लिहिल्या. त्या नऊ वर्षांच्या असताना त्यांचे कुटुंब टूटशिलमधील ग्लूसेस्टरशायर गावातील चर्चच्या कॉटेजमध्ये राहण्यास गेले.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या जे.के. रोलिंग यांना हॅरी पॉटरची कल्पना कशी सुचली...