Home »Hollywood» Sunny Leone Was Called Too Fat At The Initial Stage Of Her Career!

अरबाज बरोबर झळकणार सनी, पूर्वी लठ्ठ असल्याने मिळायचा नकारा, असा होता तेव्हाचा LOOK

दिव्य मराठी वेब टीम | Sep 14, 2017, 00:00 AM IST

मुंबई - सनी लिओनीच्या आगामी तेरा इंतजार चित्रपटाचे पोस्टर नुकतेच लाँच करण्यात आले आहे. या चित्रपटात सनी अरबाज खानबरोबर मुख्य भूमिकेमध्ये झळकणार आहे. सनीला सध्या आयटम साँगबरोबर बॉलिवूडमध्ये भरपूर काम मिळत आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा सनीला ती लठ्ठ असल्याने मॉडेलिंगही करता येत नव्हते एका कार्यक्रमात तिने याविषयी सांगितले होते.

काय म्हणाली सनी..
सनीने जेव्हा मॉडेलिंगला सुरुवात केली त्यावेळी तिला लठ्ठ असल्यामुळे नकार दिला जात होता. विशेष म्हणजे सनी बॉलीवूडमधील आजच्या सक्सेसफुल अॅक्ट्रेसेसपैकी एक आहे. चित्रपटांत येण्यापूर्वी पोर्न स्टार म्हणून ओळखले जात होते. या दरम्यान ती मॉडेलिंगही करायची. पोर्न इंडस्ट्रीत येण्यापूर्वी ती एका जर्मन बेकरीत काम करत होती.
'बिग बॉस'मधून मिळाली एंट्री..
सनी लियोनीने 2011 मध्ये कलर्स चॅनलच्या कॉन्ट्रोव्हर्शिअल रियालिटी शो 'बिग बॉस'च्या सीझन 5 मध्ये वाइल्ड कार्ड एंट्री घेतली होती. तोच तिच्यासाठी बॉलिवूडमध्ये एंट्रीचा मार्ग बनला. शोच्या एका एपिसोडदरम्यान डायरेक्टर महेश भट्ट पाहुणे म्हणून आले होते. सनीला त्यांनी त्याचवेळी अपकमिंग चित्रपटासाठी सलेक्ट केले होते. मात्र तिला पदार्पणात फारसे यश मिळाले नाही.
'जिस्म 2' बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नाही. पण सनीचे बॉलीवूडमधील करिअर मात्र सुरू झाले. सनी 'मस्तीजादे' (2016), 'वन नाइट स्टँड' (2016), 'कुछ कुछ लोचा है'(2015), 'एक पहेली लीला'(2015) आणि 'जॅकपॉट' (2013) सारख्या चित्रपटांत तिने काम केले आहे. 2014 मध्ये रिलीज झालेला 'रागिणी एमएमएस 2' तिचा पहिला यशस्वी चित्रपट ठरला. पण 'बेबी डॉल' आणि त्यानंतर सर्व आयटम साँगमुळे ती बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय ठरली.

पुढील स्लाइड्सवर पाहा सनीचे सुरुवातीच्या काळातील काही PHOTOS...

Next Article

Recommended