आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Amazing Spiderman 2 Wants To Collect 100 Crore In India

\'द अमेजिंग स्पायडरमॅन-2\'ला भारतात कमवायचा आहे 100 कोटींचा गल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जून 2012मध्ये ‘द अमेजिंग स्पायडरमॅन’ हा सिनेमा भारतात रिलीज झाला होता. हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलगू या सर्व भाषांतील या सिनेमाचा भारतातील एकुण बिझनेस 90 कोटी रुपये इतका होतका. गेल्या दोन वर्षांत भारतात थिएटरच्या संख्येत वाढ झाली असून इंग्रजी सिनेमा बघणारे प्रेक्षकही वाढले आहेत.
'स्पायडरमॅन' भारतातील मोठे ब्रॅण्ड असून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आकर्षित करतो, सोनी पिक्चर्स या निर्माती कंपनीच्या सूत्रांच्या मते, यंदा रिलीज होणारा या सिनेमाचा सिक्वेलने एकच्या भारतात तब्बल 120 कोटींचा व्यवसाय करण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे पहिल्यांदाच एखादा इंग्रजी सिनेमाने भारतात शंभर कोटींचा गल्ला गाठण्याचे ध्येय डोळ्यांपुढे ठेवलेले दिसत आहे. आपले टार्गेट पूर्ण करण्यासाठीस सोनी पिक्टर्स सिनेमाच्या प्रमोशनवर विशेष भर देत आहे. पूर्वी इंग्रजी सिनेमांच्या प्रोमोचे प्रमोशन केवळ दहा दिवस टीव्हीवर केले जाते होते. मात्र 'द अमेजिंग स्पायडरमॅन 2' या सिनेमाचे प्रमोशन महिन्याभरापूर्वीपासून सुरु केले जाणार आहे.
यासाठी सोनी पिक्चर्स आणि टी-सीरिजमध्ये एक अनोखी डील केली जाणार आहे. याअंतर्गत टी-सीरिजची निर्मिती असलेल्या आणि 11 मार्च रोजी रिलीज होणा-या 'भूतनाथ रिटर्न्स'सह 'स्पायडरमॅन 2' चा प्रोमो रिलीज केला जाईल. तर मे महिन्यात रिलीज होणा-या 'स्पायडरमॅन 2'सह टी-सीरिजच्या आगामी बिग बजेट असलेल्या 'क्रिएचर' या थ्रीडी सिनेमाचा ट्रेलर दाखवला जाईल. ही डील आता अंतिम टप्प्यात आली आहे.