आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Revenant, Mad Max Fury Road Top BAFTA 2016 Winners List

\'BAFTA\'मध्ये लियोनार्डोच्या \'The Revenant\'चा बोलबाला, मिळाले 5 अवॉर्ड्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टॉम क्रूजसोबत लियोनार्डो डिकॅप्रि‍यो - Divya Marathi
टॉम क्रूजसोबत लियोनार्डो डिकॅप्रि‍यो
लंडन- रविवारी (14 फेब्रुवारी) लंडनच्या रॉयल ओपेरा हाऊसमध्ये 69वे बाफ्टा (ब्रिटीश अॅकेडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स) अवॉर्ड्समध्ये लियोनार्डो डिकॅप्रियो स्टारर 'द रेवेनेंट' सिनेमाला तब्बल पाच पुरस्कार मिळाले. यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट साऊंड, सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफी आणि सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार सामील आहे. लियोनार्डोला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याची ट्रॉफी हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूजने दिली.
चार्लीज थेरोन स्टारर दिग्दर्शक जॉर्ज मिलरच्या अॅक्शन ड्रामा 'मॅड मॅक्स: फ्यूर रोड' सिनेमाला सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअर, सर्वोत्कृष्ट कॉस्ट्युम, सर्वोत्कृष्ट साऊंड आणि सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइनसह तब्बल चार पुरस्कार मिळाले.
केट बनली सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री...
- 'रूम' सिनेमासाठी ब्री लार्सनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
- 'टाइटॅनिक' सिनेमातून लोकप्रिय झालेली केट विंसलेटला 'स्टीव जॉब्स' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. अवॉर्ड मिळाल्यानंतर केटने सांगितले, 'हे वर्ष महिलांसाठी विलक्षण होते.'
भारतीय सिनेमाच्या दिग्दर्शकाला मिळाला पुरस्कार...
उत्कृष्ट डॉक्यूमेंट्रीचा पुरस्कार गायक एमी वाइनहाऊसवर बनलेल्या 'एमी' सिनेमाला मिळाला. याचा दिग्दर्शक आसिफ कपाडिया आहे. त्याचा जन्म लंडनमध्ये एका मुस्लिम भारतीय कुटुंबात झाला.
बाफ्टा अवॉर्ड्सच्या विजेत्यांची यादी...
सर्वोत्कृष्ट सिनेमा: 'द रेवेनेंट’
सर्वोत्कृष्ट अॅक्टर: लियोनार्डो डि कैप्रि‍यो (द रेवेनेंट)
सर्वोत्कृष्ट अॅक्ट्रेस: ब्री लार्सन (रुम)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: एलेहांद्रो जी इनयारिटू ('द रेवेनेंट)
सर्वोत्कृष्ट सपोर्टिंग अॅक्टर: मार्क रायलेंस (ब्रिज ऑफ स्पाइस)
सर्वोत्कृष्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस: केट विंसलेट (स्टीव जॉब्स)
सर्वोत्कृष्ट सिनेमा इन फॉरेन लँग्वेज: ‘वाइल्ड टेल्स’
सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंट्री: ‘एमी’
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड सिनेमा: ‘इनसाउड आउट’
सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रिनप्ले: ‘स्पॉटलाइट’ (टॉम मॅकार्थी, जोश सिंगर)
सर्वोत्कृष्ट अॅडॉप्टेड स्क्रिनप्ले: ‘द बिग शॉर्ट’
सर्वोत्कृष्ट साउंड: ‘द रेवेनेंट’
सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफी: ‘द रेवेनेंट’ (इम्मानुएल लुबेजकी)
सर्वोत्कृष्ट कॉस्ट्यूम: ‘जेनी बीवन’ (मॅड मॅक्स फ्यूरी रोड)
बेस्ट एडिटिंग: ‘मॅड मॅक्स फ्यूरी रोड’ (मार्गरेट)
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिजाइन: ‘मॅड मॅक्स फ्यूरी रोड’
सर्वोत्कृष्ट स्पेशल व्हिज्युअल इफेक्ट्स: ‘स्टार वॉर्स- द फोर्स अवेकंस’
सर्वोत्कृष्ट मेकअप अँड हेअर: ‘मॅड मॅक्स फ्यूरी रोड’ (लेसली वेंडरवाल्ट, डेमियन मार्टिन)
आऊट स्टँडिंग ब्रिटिश सिनेमा 2016: ‘ब्रुकलिन’
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या पुरस्कार सोहळ्याचे निवडक फोटो...