आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 तासांच्या इंटीमेट सीन्सच्या शूटनंतर या अॅक्ट्रेसला फुटले रडू..., जाणून घ्या काय होते कारण?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'लिव बाई नाइट' या सिनेमातील एका दृश्यात सिएना मिलर आणि बेन एफ्लेक - Divya Marathi
'लिव बाई नाइट' या सिनेमातील एका दृश्यात सिएना मिलर आणि बेन एफ्लेक
एन्टरटेन्मेंट डेस्क : हॉलिवूड अॅक्ट्रेस सिएना मिलरचा सिनेमा 'लिव बाई नाइट' सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. सिनेमात सिएनाने तिचा को-स्टार बेन एफ्लेकसोबत तब्बल नऊ तास लव्ह मेकिंग सीन्स शूट केले होते. या सीन्सच्या शूटिंगवेळी आलेला अनुभव सिएनाने एका वेबसाइटसोबत शेअर केला आहे. या सिनेमाच्या शूटिंगनंतर चक्क सिएनाला रडू कोसळले होते.
 
काय म्हणाली सिएना...  
 'लिव बाई नाइट' या सिनेमाचा बेन एफ्लेक लीड अॅक्टरसोबतच दिग्दर्शकसुद्धा आहे. सिएना बेनला भाऊ मानते. शूटिंगचा अनुभव शेअर करताना सिएना म्हणाली, "बेन आणि माझे नाते बहीणभावासारखे आहे. त्यामुळे शूटिंगवेळी जास्त Awkward फील झाले नाही. हसतखेळत शूटिंग पूर्ण झाले. तो खूप प्रोफेशनल आहे. मात्र मी नाहीये. त्या सीनची परिस्थितीच तशी होती. स्क्रिप्टनुसार आम्हा कारपासून बारपर्यंत... फक्त लव्ह मेकिंग सीन्स करायचे होते. संपूर्ण दिवसभर आम्ही फक्त लव्ह मेकिंस सीन्स केले. त्याने मला जेव्हा या सीन्सविषयी सांगितले, तेव्हा मी हे कसे होतील? असे विचारले होते. तब्बल नऊ तास शूटिंग झाले. पण तोपर्यंत मी खूप ढासळले होते. माझ्या डोळ्यांतून अश्रू थांबतच नव्हते. त्याक्षणी मला काय वाटत होते, हे मी तुम्हाला शब्दांत सांगू शकतन नाही. मला त्यावेळी फक्त स्वतःला आनंदी दाखवायचे होते, हसायचे होते."

बेनला विना कट करायचे होते शूटिंग 
या मुलाखतीत सिएना म्हणाली, एक सीन विना कट आम्हाला शूट करायचा होता. त्याने  DOP ला कॅमरा रोल करण्याचा इशारा केला. जेणेकरुन तो हे सेक्स सीन विना कट शूट करु शकेल. 'लिव बाई नाइट' या सिनेमात बेन एफ्लेकने जोई कूहलीन आणि सिएनाने एमा ग्लाउडची भूमिका साकारली होती. हा सिनेमा 25 डिसेंबर  2016 रोजी रिलीज झाला आहे. 

पुढील स्लाईड्समध्ये बघा, सिएना मिलर आणि बेन एफ्लेकचे  Photos...
बातम्या आणखी आहेत...