आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टायटॅनिक चित्रपटाचे संगीतकार जेम्स हॉर्नर यांचा अपघाती मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅलिफोर्निया - ‘टायटॅनिक’ या जगभर गाजलेल्या हॉलीवूडपटाचे संगीत दिग्दर्शक जेम्स हॉर्नर यांचे सोमवारी एका विमान अपघातात निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. जेम्स हॉर्नर यांना ‘टायटॅनिक’च्या संगीत दिग्दर्शनासाठी ऑस्कर मिळाला होता. हॉर्नर यांच्या खासगी विमानास अपघात झाल्याचे प्रशासनाने सोमवारी सकाळी जाहीर केले होते. मात्र, यात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशाचे नाव जाहीर करण्यात आले नव्हते.

हॉर्नर स्वत: हे विमान चालवत होते, असे त्यांच्या सहकार्‍याने सांगितले. कॅलिफोर्नियामधील व्हेंच्युरा कौंटीमध्ये स्थानिक प्रमाणवेळेनुसार सोमवारी सकाळी ९.३० वाजता हा अपघात झाला. एकच इंजिन असलेल्या या विमानाचे अवशेष येथील दुर्गम भागात नॅशनल पार्कमध्ये सापडले. या अपघातामुळे जंगलात आग लागली आणि ती दोन एकरांपर्यंत पसरली, असे पोलिसांनी सांगितले.

हॉलीवूडमधील सर्वाधिक यशस्वी संगीतकारांमध्ये हॉर्नर यांचे नाव अग्रस्थानी होते. १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टायटॅनिक’ या भव्य चित्रपटाच्या संगीतासाठी त्यांना दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले होते. ‘माय हार्ट विल गो ऑन‘ हे प्रचंड गाजलेले गाणेही हॉर्नर यांचेच होते. त्यांच्या ‘ब्रेव्हहार्ट‘, ‘अ ब्युटिफुल माइंड‘, ‘अवतार‘, ‘एलियन्स‘ आणि ‘अपोलो १३' या चित्रपटांच्या संगीतासाठीही हॉर्नर यांना ऑस्करचे नामांकन मिळाले होते.
बातम्या आणखी आहेत...