आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 फूट पाण्यात बुडाले होते टायटॅनिक, जाणून घ्या सिनेमाशी निगडीत 23 रंजक FACTS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'टायटॅनिक' जहाजावर आधारित 'टायटॅनिक' सिनेमा 1 नोव्हेंबर 1997 रोजी रिलीज झाला होता. हा सिनेमा रिलीज होऊन जवळजवळ सतरा वर्षे झाली आहेत. तर टायटॅनिक जहाजबुडीच्या घटनेला 15 एप्रिल रोजी 102 वर्षे पूर्ण झाली. जहाजबुडीच्या सत्यघटनेवर आधारित या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. या सिनेमाचा निर्मिती खर्च 1205 कोटी इतका होता, तर सिनेमाने 14 हजार कोटींचा बिझनेस केला होता. अनेक अवॉर्ड्स या सिनेमाने आपल्या नावी केले होते. जेम्स कॅमरुन दिग्दर्शित या सिनेमात टायटॅनिक जहाज बुडण्याची घटना चित्रीत करण्यात आली होती.
हा सिनेमा चित्रीत होतानाच्या काही रंजक बाबी आज आम्ही तुम्हाला या पॅकेजच्या माध्यमातून सांगत आहोत.
टायटॅनिकशी निगडीत फॅक्ट्स
1... निर्माते या सिनेमातील जॅकच्या भूमिकेसाठी मॅथ्यू मॅककोनाघे या अभिनेत्याला घेऊ इच्छित होते. मात्र दिग्दर्शक जेम्स कॅमरुन यांनी या भूमिकेसाठी लिओनार्डो डिकैप्रियोला आपली पसंती दिली होती.
2.. 'रोज'च्या म्हातारपणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री ग्लोरिया स्टुअर्ट सिनेमात काम करणारी एकमेव अशी कलाकार होती जी 1912मध्ये टायटॅनिक जहाजबुडीची घटनेची साक्षीदार होती.
3.. ज्या महासागराला तुम्ही सिनेमात पाहिले, ते महासागर नसून शुटिंगसाठी केवळ तीन फूट पाण्याचा तलाव तयार करण्यात आला होता.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या टायटॅनिक सिनेमाशी निगडीत अशाच आणखी काही रंजक गोष्टी...