आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉम क्रूजने केला 300 कोटींचा मानहानीचा दावा, न्यायालयाच्या बाहेरच मिटले प्रकरण...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिका माध्यम समूह 'बोउर' व त्याचे दोन मासिक 'इन टच' आणि 'लाइफ एंड स्टाइल' च्या विरोधात हॉलिवूडचा सुपरस्टार टॉम क्रूजने दाखल केलेला 5 कोटी डॉलरचा (जवळपास 300 कोटींचा) दावा न्यायालयाबाहेर सामंजस्य करून निपटवण्यात आला. ऑक्टोंबरमध्ये टॉमने या मासिकांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता.
टॉमनं सांगतलं, की ग्लॅमर आणि लाइफस्टाइल या मासिकांनी माझी पत्नी केटी होम्ससोबत घटस्फोट झाल्यानंतर मी माझी मुलगी सूरी हिला एकटं सोडलं होतं असे वृत्त प्रकाशित केले होते. त्यावेळी टॉमचा वकिल बर्ट फील्डने या मासिकांच्या वृत्तांना 'तिरस्कारीत' आणि 'खोटे वृत्त' असल्याचा करार दिला होता. त्यादरम्यान बोउर पब्लिशिंग टीमने याप्रकरणाला साइंटालॉजीसोबत जोडले होते. त्यांनी सांगितलं, की पत्नीसोबत घटस्फोट झाल्यानंतर मुलगी सूरी क्रूजला भेटण्यासाठी टॉमच्या निर्णयामध्ये साइंटालॉजी चर्चच्या सदस्याने त्याला मदत केली होती.