आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नो ‘गंगनम स्टाइल’ प्लीज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरियाचा गायक साईच्या ‘गंगनम स्टाइल’ गाण्याने जगभरात धूम केली आहे. प्रत्येकजण या गाण्यावर नृत्य करण्यासाठी उत्सुक असतो. मात्र हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूजने गंगनम स्टाइलवर ताल धरण्यास चक्क करण्यास नकार दिला. झाले असे की, अलीकडेच टॉम आपल्या ‘जॅक रिचर’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी दक्षिण कोरियाची राजधानी सियोलला गेला होता.

तेथे चाहते त्याची वाट पाहत होते. काही चाहत्यांच्या हातात ‘टॉम स्टाइल’ लिहिलेले पोस्टर होते. चाहत्यांनी त्याला आपल्या स्टाइलमध्ये गंगनम स्टाइलवर ताल धरण्याचा आग्रह केला. मात्र टॉमने ‘माझ्यापेक्षा साईच चांगले गंगनम स्टाइल करू शकतात’, असे म्हणत डान्स करण्याचे टाळले.