आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉलीवूडपटाद्वारे प्रसिद्ध टॉम आेलांद नवा स्पायडरमॅन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजलिस - किशोरवयीन कलाकार टॉम आेलांद आता नव्या स्पायडरमॅन पटात मुख्य भूमिकेत दिसेल. यापूर्वी टॉम ‘बिली इलियट द म्युझिकल’ या हॉलीवूड पटाद्वारे प्रकाशझोतात आला होता. सोनी पिक्चर्स व मार्व्हल स्टुडिआेजने १९ वर्षीय आेलांदची निवड या भूमिकेसाठी निश्चित केली आहे.

नवा स्पायडरमॅन पट २८ जुलै २०१७ रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे. निर्माता केविन फीज व अॅमी पास्कल यांनी नव्या स्पायडरमॅनच्या शोधासाठी जागतिक स्तरावर व्यापक मोहीम हाती घेतली होती. या दीर्घ शोधानंतर आता टॉम आेलांदचे नाव या भूमिकेसाठी निश्चित करण्यात आले आहे. निर्माता कंपनीने टॉम आेलांदच्या ‘द इम्पॉसिबल’, ‘वुल्फ हॉल’ यातील भूमिकांनी प्रभावित होऊन त्याची निवड केली.

लवकरच त्याचा ‘इन द हार्ट ऑफ द सी’ चित्रपट प्रदर्शित होईल. निवड प्रक्रियेनंतर त्याची निवड करण्यात आली. आल्याचे निर्माता कंपनीच्या सूत्रांनी सांगितले. टॉम प्रेक्षकांची मने जिंकणारच, असा विश्वास सोनी पिक्चर्सने व्यक्त केला.
बातम्या आणखी आहेत...