आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थाटात रंगला 86वा ऑस्कर सोहळा, जाणून घ्या OSCARSच्या या इंट्रेस्टिंग गोष्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजेलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये 86 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा मोठ्या थाटात पार पडला. यंदाच्या ऑस्करमध्ये ग्रॅव्हिटी सिनेमाने आपली मोहोर उमटवली. तब्बल सात ऑस्कर या सिनेमाने आपल्या नावी केले. तर '12 इयर्स अ-स्लेव' या सिनेमाने सर्वोत्कृष्ट सिनेमाचा बहुमान पटकावला आहे.
सिनेसृष्टीतील अत्युच्च शिखर मानल्या जाणा-या या ऑस्कर सोहळ्याविषयीच्या काही इंट्रेस्टिंग गोष्टी आम्ही तुम्हाला या पॅकेजमधून सांगत आहोत.
सुरुवातीच्या काळात ऑस्कर नाईटविषयी सस्पेन्स राहात नव्हता. कारण विजेत्याच्या नावाची घोषणा तीन महिन्यांपूर्वीच केली जात होती. हळूहळू यात बदल होत गेला. विजेत्यांच्या नावाची घोषणा आधी करण्याऐवजी अवॉर्ड नाईटच्याच दिवशी केली जाऊ लागली. मात्र सगळ्या मीडिया हाऊसला याची माहिती रात्री अकरापर्यंत पाठवून दिली जात होती. 1940 पर्यंत ही पॉलिसी चालली. मात्र 1940 साली लॉस एंजिलिस टाईम्सने अवॉर्ड नाईटच्यापूर्वीच आपल्या इव्हिनिंग एडीशनमध्ये विजेत्यांच्या नावाची यादी प्रकाशित केली होती. त्यामुळे अवॉर्ड सोहळ्याचे सस्पेन्सवर पाणी फिरले. तेव्हापासून विजेत्यांची नावे बंद लिफाफ्यात ठेवली जातात आणि लाईव्ह प्रोग्राममध्येच विजेत्यांच्या नावाची घोषणा केली जाऊ लागली. 1941 सालापासून तब्बल 2600 हून अधिक विजेत्यांच्या नावाचे लिफाफे गोळा झाले आहेत.
पहिला ऑस्कर अवॉर्ड सोहळा 16 मे 1929 रोजी हॉलिवूडच्या रुजवेल्ट हॉटेलच्या बँक्वेट हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या पहिल्या अवॉर्ड सोहळ्यात जवळपास 270 लोक सहभागी झाले होते. येथे येणा-या पाहुण्यांना पाच डॉलरचे तिकिट खरेदी करावे लागले होते. यामध्ये 15 ऑस्कर ट्रॉफी वितरीत करण्यात आल्या होत्या. पहिला ऑस्कर जिंकणारे जर्मनीचे ट्रॅजेडी किंग एमिल जॅनिंग होते. दुस-या वर्षीच ऑस्कर अवॉर्डला एवढी प्रसिद्धी प्राप्त झाली की लॉस एंजिलिसच्या रेडिओ स्टेशनवर पूर्ण कार्यक्रम एक तास लाईव्ह प्रसारित करण्यात आला होता.
ऑस्कर सोहळ्यात सहभागी होणा-या पाहुण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली होती. त्यामुळे 16 वा ऑस्कर अवॉर्ड सोहळा बँक्वेट हॉलऐवजी पहिल्यांदा ग्रॉमॅनच्या चायनीज थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला. 1953 साली पहिल्यांदा हा अवॉर्ड सोहळा टीव्हीवर टेलिकास्ट झाला. अमेरिका आणि कॅनडाच्या लाखो प्रेक्षकांनी घरबसल्या हा अवॉर्ड सोहळा बघितला होता. अवॉर्ड सोहळ्याचे कलर ब्रॉडकास्टिंग 1966 मध्ये झाले आणि 1969 साली हा अवॉर्ड सोहळा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसारित करण्यात आला होता.
ऑस्करविषयीची अधिक रोचक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...