आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video & Pix: रिलीज झाला अॅक्शनचा तडका असलेल्या 'Furious 7' चा ट्रेलर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('फ्यूरियस 7' या सिनेमातील एक दृश्य)
मुंबईः 'फ्यूरियस 7' या नवीन हॉलिवूड सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. हा सिनेमा 'फास्ट अँड फ्यूरियस' सीरिजचा सातवा भाग आहे. या सीरिजचे मागील सर्व सिनेमे प्रचंड गाजले. 'फ्यूरियस 7'पासूनदेखील प्रेक्षकांना ब-याच अपेक्षा आहेत.
'फ्यूरियस 7'चा ट्रेलर 2 मिनिटे 42 सेकंदांचा आहे. या सिनेमात अॅक्शनचा तडका बघायला मिळणार आहे. आत्तापर्यंतच्या सहा भागांत कारमध्ये अॅक्शन करणारे स्टार्स आपण पाहिले. आता या नवीन भागात हे स्टार्स विमान आणि गाड्यांमध्ये थरारक स्टंट्स करताना दिसतील. या सिनेमाचा ट्रेलर 1 नोव्हेंबर रोजी रिलीज करण्यात आला. अल्पावधीतच हा ट्रेलर एक कोटींपेक्षा जास्त लोकांनी लाइक केला आहेत. या सिनेमात विन डीजल, पॉल वॉकर, ड्वेन जॉनसन, मिशेल रोड्रिग्ज, जॉर्डन, ट्रायसे गिब्सन, लुकास काला, जेसन स्टाथम मुख्य भूमिकेत आहेत.
'फ्यूरियस 7' हा सिनेमा जेम्स वान यांनी दिग्दर्शित केला असून नील एच मोरित्ज आणि विन डीजल निर्माते आहेत. पुढील वर्षी म्हणजे 3 मार्च 2015 रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
पुढे पाहा, या सिनेमाच्या ट्रेलरचा व्हिडिओ (दुस-या स्लाईडमध्ये) आणि छायाचित्रे...