आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ultimate Show Off! Mallika Sherawat Flaunts Her Lamborghini Like A Kid, See Video

मल्लिकाचा Show Off: हाताला नाही काम, तरीही लेम्बर्गिनी घेऊन फिरतेय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बी-टाऊन ड्रामा क्वीन मल्लिका शेरावतच्या झोळीत सध्या एकाही सिनेमा नसला तरी ती लाइमलाइटपासून दूर राहत नाही. तिचा लास्ट रिलीज 'द डर्टी पॉलिटिक्स' सिनेमा कधी आला आणि कधी गेला कळालेच नाही. काही दिवसांपूर्वी मल्लिका कान्सच्या रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवताना दिसली होती.
अलीकडेच मल्लिकाने आपल्या टि्वटर अकाऊंटवर 6 सेकंदाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये ती कारमध्ये छोट्या मुलांप्रमाणे स्वत:ला Show off करताना दिसत आहे. व्हाइल कलरच्या लेम्बोर्गिनी अव्हेंटाडोर एसवी कारच्या ड्रायव्हिंग सीटवर ग्रेसफुली बसलेली मल्लिका व्हिडिओमध्ये गुड-बायच्या पोज देताना दिसत आहे.
मल्लिकाने स्वत:ला लेम्बोर्गिनी कार खरेदी केलेली नाहीये, तिला ही कार व्हॅलेंटाइन गिफ्टच्या रुपात एका अज्ञात व्यक्तीने दिली आहे. तसे पाहता मल्लिका आपल्या खासगी आयुष्यावर नेहमी मौन बाळगते. 'मेरे ख्यालो की मल्लिका' या टीव्ही रिअॅलिटी शोचा विजेता विजय सिंहसोबत तिचे नाव जुळले होते. मात्र काही दिवसांतच दोघे वेगळे झाले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून करून पाहा, लेम्बोर्गिनीवर पोज देताना मल्लिकाचे काही फोटो...