आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

RARE PICS: मर्लिन मन्रोची अतिशय दुर्मिळ छायाचित्रे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोनेरी रंगछटांचे केस, हॉट रेड लिपस्टिक आणि कमनीय बांध्यामुळे मर्लिन मुन्रो हॉलिवूडबरोबरच संपूर्ण जगात वुमन अ‍ॅण्ड युथ आयकॉन मानली जाते. ५ ऑगस्टला मर्लिनच्या रहस्यमय मृत्युला ५० वर्षे पूर्ण झाली. एवढी वर्षे लोटल्यानंतरही २१व्या शतकातील तरुणांवर या 'सौंदर्याच्या अ‍ॅटमबॉम्ब'ची जादू कायम आहे.
चित्रपट आणि संगीत क्षेत्रातील मोठमोठ्या व्यक्ती मर्लिनसारखे दिसण्याचा प्रयत्न करताना दिसतात. जर तुम्ही जगातील प्रमुख सेलिब्रिटी मॅग्झिन्सवर एक नजर टाकली तर हे तुमच्या सहज लक्षात येईल. गेल्या काही वर्षात अभिनेत्री टेलर स्विफ्ट, स्कार्लेट जॉनसन, चार्लीज थेरान आणि निकोल किडमॅनपासून ते पॉप क्विन मॅडोनापर्यंत सगळ्याजणी मर्लिन मुनरोसारखे दिसण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मर्लिनवर आधारित चित्रपट आणि टीव्ही मालिका तयार झाल्या आहेत.
लोकांमधील मर्लिनचे वेड एवढ्यावरच संपत नाही. मर्लिनच्या लोकप्रिय व्यक्तिमत्त्वाचे गारुड आजही हॉलिवूडवर दिसून येते. अभिनेता सीवॉर्ड जॉनसन मर्लिनचा मोठा चाहता आहे. त्याने मर्लिनची २६ फूट उंच आणि १५४२२ किलो वजनाची प्रतिमा तयार केली असून ती अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरात प्रदर्शित करण्यात आली आहे.

मर्लिनची अतिशय दुर्मिळ छायाचित्रे पाहण्यासाठी पुढच्या लिंकवर क्लिक करा...