आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: 'हर्कुलस'चा ट्रेलरच करतो रोमांचित, 1 ऑगस्टला भारतात रिलीज होणार सिनेमा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('हर्कुलस'च्या एका सीनमध्ये 'द रॉक')
मुंबई - 'द रॉक' या नावाने प्रसिद्ध असलेला हॉलिवूड अभिनेता इवेन जॉनसनचा 'हर्कुलस' हा सिनेमा यावर्षी 1 ऑगस्टला भारतात रिलीज होतोय. यूएसमध्ये 25 जुलै रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर या सिनेमाला तुफान प्रतिसाद मिळतोय.
हॉलिवूड सिनेमांचे चाहते 'हर्कुलस'चा ट्रेलर बघूनच रोमांचित झाले असून भारतात सिनेमाच्या रिलीजची प्रतिक्षा करत आहेत. भारतात हा सिनेमा हिंदी, इंग्रजी आणि तामिळ भाषेत रिलीज होतोय. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये अॅक्शन आणि युद्धाचे सीन जबरदस्त दिसत आहेत. रॉक या सिनेमात वेगळ्याच रुपात दिसतोय. भारतात रॉकला प्रोफेशनल रेसलिंगमुळे बरीच लोकप्रियता मिळाली आहे. त्यामुळे त्याच्या सिनेमावर भारतीय सिनेरसिकांचे लक्ष लागले असून सिनेमाचे व्यवसायिक गणिक काय असेल, याचीही चर्चा रंगत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'हर्कुलस' या हॉलिवूड सिनेमाच्या ट्रेलरमधून घेण्यात आलेली निवडक छायाचित्रे आणि व्हिडिओ...