आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुषांसोबतही आहेत ब्रॅड पिटचे शारीरिक संबंध, पहिल्यांदाच बघा 'ब्रँजेलिना'चा Wedding Album

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः जगभरातील सिनेरसिकांच्या गळ्यातील ताईत असलेली हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली तिचा नवरा ब्रॅड पिटपासून घटस्फोट घेण्याच्या तयारीत आहे. या दोघांचे अनेक वर्षे सर्वांनाच हेवा वाटेल असे सुरु असणारे नाते अखेर संपुष्टात येण्याच्या वळणावर आले आहे. एका वृत्तसंस्थेने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन या बातमीला दुजोरा दिला आहे. अँजेलिनाने तिच्या मुलांवर हक्क सांगत त्यांची जबाबदारी स्वत:कडे ठेवण्याची मागणी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दाम्पत्याच्या संपर्कात असणाऱ्यांनी ब्रॅडच्या त्याच्या मुलांसोबतच्या गैरवर्तणुकीमुळेच अँजेलिनाने घटस्फोटाचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. हा निर्णय सर्वस्वी अँजेलिनानेच घेतला असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांमार्फत मिळाली आहे. 2014 ला हे दोन्ही कलाकार विवाहबंधनात अडकले होते. त्याआधीपासूनच ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते.
जॉनचे दुसरे तर अँजेलिनाचे तिसरे लग्न...
- ‘मि अॅण्ड मिसेस स्मिथ’ चित्रपटाच्या सेटवर ब्रॅड आणि अँजेलिनाची भेट झाली.
- या आधी ब्रॅडचे जनेफर आईन्स्टनशी लग्न झाले होते.
- तर अँजलिनाचे पहिल्यांदा जॉनी ली मिलर आणि त्यानंतर बिली बॉब थ्रॉंटॉनशी लग्न झाले होते.
पुरुषांसोबत आहेत ब्रॅडचे संबंध..
- रिपोर्टनुसार, अँजेलिना हिने कोर्टात केल्याला अर्जात म्हटले आहे की, तिला सहाही मुलांसोबत राहायचे आहे. या दाम्पत्याने वेगवेगळ्या देशातून तीन मुले दत्तक घेतली आहेत. तर तीन मुलांना अँजेलिना हिने जन्म दिला आहे.
- दुसरीकडे, पिटनेही मुलांसोबत राहाण्याची इच्छा दर्शवली आहे. पण, पिट वडिलांच्या जबाबदार्‍या पार पाडू शकत नसल्याचा आरोप अँजेलिना हिने केला आहे. पण खरे कारण मात्र वेगळे असल्याची चर्चा आहे.
- पिटचे दोन महिलांसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचे बोलले जात आहे. एकीचे नाव ग्वॅनेथ पाल्ट्रो तर दुसरीचे नाव मॅरियन कोटिलॉर्ड असे आहे.
- एका बातमीनुसार पिट सध्या गे रिलेशनशिपमध्येसुद्धा आहे. त्याला एका कोलंबियाई सिटीजनसोबत अनेकदा बघितले गेले आहे.

किती महागडा असेल हा घटस्फोट..?
- एका मीडिया रिपोर्टनुसार, अँजेलिना आणि ब्रॅड 400 मिलियन डॉलर (जवळपास 2600 कोटी) वर सेटलमेंट करू शकतात.
- रिपोर्ट्सनुसार, अँजेलिना गेल्या जुलैपासून पतीच्या गैरवर्तनामुळे त्रस्त आहे. या टेन्शनमध्ये तिचे स्मोकिंगचे प्रमाणही वाढले आहे. तिने पिटची पहिली पत्नी जेनिफर एनिस्टनची भेटही घेतली होती.

2014 मध्ये अडकले लग्नगाठी..
- 52 वर्षीय पिट आणि 40 वर्षीय ऑगस्ट 2014 मध्ये विवाह केला होता. मात्र, दोघे 2004 पासूनच लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. दोघे जुलै महिन्यात शेवटचे एकत्र दिसले होते.
- अँजेलिना आणि ब्रॅड पिटने कुटुंब आणि मित्रांव्दारे आयोजित खासगी सोहळ्यात ऑगस्ट 2014 फ्रान्समध्ये लग्न केले.
- फ्रान्समध्ये लग्न करण्यापूर्वी अँजेलिना आणि ब्रॅडने कॅलिफोर्नियाच्या स्थानिक जजकडून मॅरेज लायसेन्स घेतले होते.
- या लग्नात दोघांची मुलेसुध्दा उपस्थित होती.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिटचा Wedding Album...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...