आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: नरेंद्र मोदींनी का केला 600 कोटींच्या \'ग्रॅव्हिटी\'चा उल्लेख, जाणून घ्या सिनेमातील फॅक्टस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'ग्रॅव्हिटी' सिनेमातील एक दृश्य.

मुंबई - आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथे स्थित सतीश धवन स्‍पेस सेंटरमधून सोमवारी (30 जून) सकाळी 9.52 वाजता पीएसएलवी सी-23 रॉकेट अवकाशात सोडण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत पार पडलेला हा कार्यक्रम यशस्वी ठरला, परंतू त्यांनी हॉलिवूड सिनेमा 'ग्रॅव्हिटी'च्या भाषणात केलेल्या उल्लेखातून सिनेमा आणि सिनेप्रेमींनादेखील एक संदेश मिळाला.
लॉन्‍च यशस्वी होताच पीएम मोदींनी वैज्ञानिकांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी यावेळी हॉलिवूडच्या 'ग्रॅव्हिटी' या सिनेमाचा उल्लेख केला आणि सांगितले की, मंगळ मोहिमेला आलेला खर्च हा सिनेमा बनवण्यासाठी लागलेल्या खर्चापेक्षा कमी आहे, ही गोष्ट कौतुकास्पद आहे. परंतू आता तुम्हाला वाटत असेल की मोदींनी ग्रॅव्हिटीचाच का उल्लेख केला असेल? हॉलिवूडमध्ये इतरही सिनेमे बनवण्यात तितकाच किंवा त्यापेक्षा जास्त खर्च आला आहे. खरंतर 'ग्रॅव्हिटी' हा 2013 मध्ये आलेला एक सायन्स फिक्शन सिनेमा आहे, ज्याचा मुळ गाभा अवकाश अभियान हाच होता. सिनेमा बनवण्यासाठी जवळपास 600 कोटींचा (100 मिलियन डॉलर्स) खर्च आला होता, तर भारतातील मंगळ अंतराळ मोहीमेचा खर्च 450 कोटी (72.9 मिलियन डॉलर्स) होता. कदाचित याचमुळे मोदींनी या सिनेमाचा उल्लेख आपल्या भाषणात केला असावा.
सिनेमात तीन शटल चालक दलातील तीन सदस्यांची कथा आहे, जे हबल दुर्बीण दुरूस्त करण्यासाठी विमानाच्या बाहेर येतात आणि त्यांना अवकाशातील पडझडीचा सामना करावा लागतो. या 3D स्पेस थ्रिलर सिनेमाचे दिग्दर्शन अल्फोन्सो क्यूरोन यांनी केले होते. या सिनेमात सँड्रा बुलॉक आणि जॉर्ज क्लूनी या कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या. 'ग्रॅव्हिटी' आणि त्यासंबंधी काही फॅक्टस् आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की या अभियानावेळी दिले गेलेल 'ग्रॅव्हिटी'चे उदाहरण कसे चपखल ठरले आहे...
हे आहेत 'ग्रॅव्हिटी' या सिनेमाशी निगडीत काही फॅक्ट्स
- 2013मध्ये आलेला 'ग्रॅव्हिटी' या सिनेमाला 2014मध्ये ऑस्करचा पुरस्कार मिळाला होता. हा एक ब्रिटिश अमेरिकन 3D सायन्स फिक्शन सिनेमा होता.
- 'ग्रॅव्हिटी' सिनेमाची थीम स्पेस रिसर्च, अंतराळ मोहीम आणि अंतराळवीरांच्या आयुष्यावर आधारित होती. या सिनेमात अंतराळवीर आणि त्यांच्यासमोर येणाऱ्या अडचणी आणि अंतराळ मोहीमांचे शानदार चित्रण करण्यात आले आहे.
- या सिनेमाने बेस्ट साउंड, बेस्ट विजुअल इफेक्ट्स, सिनेमॅटोग्राफी आणि एडिटिंगसह एकूण 7 श्रेणींत पुरस्कार पटकावले होते.
- या सिनेमाला 2014च्या ऑस्कर अवॉर्ड्ससाठी 10 गटांमध्ये नामांकन मिळाले होते. त्यातले 7 पुरस्कार या सिनेमाने आपल्या नावावर केले होते.
- सिनेमा तयार करण्यासाठी एकूण खर्च 600 कोटी रुपये (100 मिलियन डॉलर) आला होता, जे की खुप मोठे बजेट होते.
- या सिनेमाने भारतात पहिल्याच आठवड्यात पेड प्रिव्यू, थ्रीडी आणि रेग्युलर स्क्रीनिंगच्या माध्यमातून 8 कोटी कमावले. ही कमाई हॉलिवूड सिनेमा 'अवतार'च्या बरोबरीची होती.
- 'ग्रॅव्हिटी' हा सिनेमा पाहून 'अवतार'चे दिग्दर्शक जेम्स कॅमरुन म्हणाले होते, हा सिनेमा पाहून मी दंग झालो आहे आणि पूर्णपणे फिदा झालो आहे. मला वाटतं हा आतापर्यंतचा अंतराळाबद्दलचा सगळ्यात उत्कृष्ट सिनेमा आहे. जेम्स कॅमरुन यांनी याला अंतराळातील बेस्ट फोटोग्राफी असे म्हटले आहे.
पुढील स्लाइड्समध्ये पाहा सिनेमातील 28 फोटोज...