(हॉलिवूड अभिनेत्री एरिका इर्विन आणि आपल्या आईसोबत ज्योती आमगे)
नागपूर - आपल्या कमी उंचीमुळे जगभरात प्रसिद्ध असलेली नागपूरची ज्योती आमगे या 22 वर्षीय तरुणीला हॉलिवूडचे तिकिट मिळाले आहे. 'अमेरिकन हॉरर स्टोरीः फ्रेक शो' या हॉलिवूड सिनेमात ती झळकणार आहे. अलीकडेच या सिनेमाच्या प्रीमिअरवेळी ज्योतीला अमेरिकन स्टार्ससोबत मंच शेअर करण्याची संधी मिळाली. यावेळी हॉलिवूड अभिनेत्री एरिका इर्विनने ज्योतीला आपल्या खांद्यावर बसवले. या सिनेमात ज्योतीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
प्रीमिअरवेळी हॉलिवूड स्टार्ससोबत ज्योतीची जबरदस्त बॉडिंग बघायला मिळाली. काही स्टार्सनी तिला खांद्यावर उचलून घेतले, तर काहींनी तिला कुशीत घेतले.
मुळची नागपूरची असलेल्या ज्योतीच्या नावावर जगातील सर्वात कमी उंचीच्या महिलेचा रेकॉर्ड आहे. या रेकॉर्डची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे. ज्योतीची उंची 62.8 सेमी (2 फूट 0.6 इंच) एवढी आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा हॉलिवूड स्टार्ससोबतची ज्योतीची खास छायाचित्रे...