आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World\'s Highest Paid Model Of 2014 Gisele Bundchen

कमाईत जगात नंबर वनवर आहे ही मॉडेल, पाहा निवडक छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - गिसेल बंडशेन)

लॉस एंजलिस: मॉडेलिंगच्या क्षेत्रात सर्वाधिक कमाई करणारी मॉडेल म्हणून गिसेली बंडशेनची नोंद झाली आहे. सुपर मॉडेलने गेल्या 12 महिन्यांत सुमारे 285 कोटी रुपये एवढी तिची कमाई होती, असे 'फोर्ब्स'चे म्हणणे आहे. ब्राझीलचे सौंदर्य म्हणून ओळख असलेली 34 वर्षीय गिसेली अनेक बड्या कंपन्यांच्या जाहिरात मोहिमेत अग्रस्थानी आहे. त्यात एच अँड एम, स्टुअर्ट विट्समन, बॅलेन्सियागा यासारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सचा समावेश आहे. यादीत व्हिक्टोरियाज सिक्रेट मॉडेल डॉट्झन क्रोस, अँड्रियना लिमा यांनी दुसरे स्थान मिळवले आहे.
1993 मध्ये करिअरला सुरुवात
गिसेल तेरा वर्षांची असताना एलीट मॅगझिनने तिला लाँच करण्याचा निर्णय घेतला. तिची निवड एलीट लूक ऑफ द इयर या स्पर्धेसाठी करण्यात आली. येथे ती दुस-या स्थानावर राहिली. वयाच्या 14 व्या वर्षापासून गिसेलने प्रोफेशनल मॉडेलिंगला सुरुवात केली. 1996मध्ये तिला न्युयॉर्क फॅशन वीकमध्ये पहिली मोठी संधी मिळाली होती.
अनेक वर्षांपासून टॉपवर...
गेल्या काही वर्षांपासून गिसेल जगातील सर्वाधिक कमाई करणारी मॉडेल आहे. 2012मध्ये फोर्ब्स मॅगझिनने तिला सर्वाधिक कमाई करणा-या मॉडेल्सच्या यादीत पहिले स्थान दिले होते.
लियोनार्डोची होती गर्लफ्रेंड...
2000 ते 2005 या काळात गिसेल आणि लियोनार्डो डी कॅप्रियो रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर फेब्रुवारी 2009मध्ये गिसेलने फुटबॉल प्लेयर टॉम ब्रेडेसह लग्न केले. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा गिसेलची निवडक छायाचित्रे...