आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुषही लपून-छपून करतात महिलांसारखी ही 10 कामे, सांगत नाही कोणाला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पल्या समाजात पुरुषांना नेहमी स्वतःला शक्तीशाली दाखवायचे असते. मृदू किंवा भावनिक पुरुषांना चिढवले जाते. बायकांसारखे वागतो, असे त्याला म्हटले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का, अशा अनेक गोष्टी असतात ज्या महिला करतात, त्या पुरुषही करतात. पण हे सर्व पुरुष लपून करतात.

गमतीशीर आहेत या गोष्टी...
lifebuzz.com च्या स्टाफ कॅमिला विल्लाफाने यांनी त्यांच्या ऑब्झरव्हेशन आणि रिसर्चच्या आधारे अशा अनेक बाबींचा उल्लेख केला आहे, ज्या शक्यतो महिला करतात असे समजले जाते. अनेक पुरुष लपून छपून या गोष्टी करत असतात. महिलांनी या गोष्टी करणे यात काही विशेष नाही. पण एखादा पुरुष असे करत असेल तर लोक त्यांची खिल्ली उडवतात. त्यामुळे अशी कामे पुरुष लपून करत असतात. या मजेदार गोष्टी वाचून तुम्ही हसू आवरू शकणार नाहीत.
 

पार्लरमध्ये मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर करताना अनेक महिला आपण पाहिल्या असतील. अनेक पुरुष याबाबत महिलांची खिल्लीही उडवतात की महिला तासन तास पार्लरमध्ये वेळ वाया घालवतात. पण तुम्हाला माहिती आहे का, की असे अनेक पुरुष आहेत जे स्वतः पार्लरमध्ये जाऊन हे सर्व करून घेतात. त्यांनाही पार्लरमध्ये मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर करायला आवडते.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, अशी इतर कामे जी पुरुष लपून करतात..
बातम्या आणखी आहेत...