आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 10 Of The Most Dangerous Countries To Be A Woman

भारतासह या 10 देशात महिलांवर होतात सर्वात जास्त अत्याचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंसेची शिकार झालेल्या अफगाणिस्तानच्या महिलेचा फाइल फोटो
नवी दिल्ली- 25 नोव्हेंबर अर्थातच 'महिलांच्या विरुध्द हिंसा संपवण्याचा दिवस'. जगभरात महिलांसोबत होणारे गुन्हे आणि अत्याचार थांबवण्याच्या हेतूने संयुक्त राष्ट्राने 25 नोव्हेंबरला 'महिलांच्या विरुध्द हिंसा संपवण्याचा दिवस' म्हणून घोषित केले होते. या दिवशी संपूर्ण जगात बलात्कार, कौंटुंबीक हिंसा आणि इतर हिंसेच्या शिकार होणा-या महिलांच्या प्रती जागृकता पसरवण्याचा प्रयत्न केला जातो.
मोठ्या प्रमाणात होतेय हिंसा-
अनेक घोषणा, कार्यक्रम, प्रयत्न आणि अनेक यशानंतरसुध्दा जगात काही भागांत आजसुध्दा महिलांसोबत मोठ्या प्रमाणात हिंसा होत आहे. विविध देशांत अशा परिस्थितीच्या तक्रारींची नोंद घेतलीच जात नाही. परंतु काही संस्था यासाठी सतत प्रयत्न करत आहेत.
10 सर्वात वाईट देश-
आज आम्ही तुम्हाला थॉम्पसन रायटर्स फाऊंडेशन, वर्ल्ड रिपोर्ट 2014 आणि फाऊंडेशन फॉर सस्टस्टनेबल डेव्हलपमेंटच्या वतीने एकत्रित करण्यात आलेल्या आकड्यांच्या आघारे 'महिलांसाठी जगातील 10 खबार देशां'विषयी सांगत आहोत. प्रतिष्ठीत मासिक theneweconomy.comने या आकड्यांचे विश्लेषण केले होते आणि या देशाची माहिती सादर केली होती.
अफगाणिस्तान यादीत सर्वप्रथम-
अफगाणिस्तान महिलांसोबत होणा-या हिंसेच्या बाबतीत सर्वप्रथम क्रमांकावर आहे. येथे निरक्षर महिलांची संख्या 87 टक्के आहे. 70 ते 80 टक्के महिलांचे बळजबरीने लग्न केले जाते. 54 टक्के महिलांची लग्ने वयाच्या 15 ते 19 वर्षी केले जाते. शिवाय येथे महिला कौंटुंबीक हिंसेच्या शिकार होण्याचे प्रमाण जास्त आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या इतर देशांविषयी, जिथे महिलांवर सर्वाधिक हिंसा होते...