आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 10 Years Old Boy Faces Off Against Giant Crocodile In Australia's Zoo

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Pics: 10 वर्षांच्या चिमुकल्यावर मगरीचा जीवघेणा हल्ला, उडी मारून वाचवला जीव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मगरीचे पिल्लू एका 10 वर्षांच्या मुलावर हल्ला करताना)
भव्य मगरीसमोर जाण्याची हिम्मत एखादा व्यक्तीच करू शकतो. परंतु ऑस्ट्रीयामध्ये एका 10 वर्षांच्या चिमुकल्याने असे करून दाखवले आहे. या मुलाचे नाव रॉबर्ट इरविन आहे. गुरुवारी (25 सप्टेंबर) रॉबर्ट क्वींसलँडच्या सनशाइन कोस्टमध्ये एका ट्रेनरसह मगरींना खाद्य खाऊ घालवण्यास पोहोचला. यावेळी एका छोट्या मगरीने रॉबर्टवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या मुलाने उडी मारून स्वत:ला वाचवले.
10 वर्षांच्या या चिमुकल्याने वडील स्टीव्ह इरविन जगातील प्रसिध्द क्रोकोडायल हंटर होते. त्यांचे 2006मध्ये निधन झाले. त्याची आईदेखील अशा भयावह कामात कुशल आहे. स्टीव्ह मुलगा रॉबर्टला बालपणी मगरीच्या जवळ घेऊन जात होते आणि त्यांना कुशीत घेऊन खाद्य देत होते.
ऑस्ट्रेलियाच्या या प्राणीसंग्रालयात प्रत्येक गुरुवारी (25 सप्टेंबर) फिंडींग शोचे आयोजन केले जाते. त्यावेळी रॉबर्टने त्याच्या वडिलांचा खास मित्र वेस मैन्नियोनसह मगरींना खाद्य दिले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा छायाचित्रे...