न्यूयार्क - अमेरिकेसारख्या प्रगत देशामधील लोक सुध्दा योगासने आणि प्राणायमाकडे वळत आहेत. रविवारी न्युयार्क टाईम्स चौकामध्ये 11,000 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येवून योगासनाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला असल्याचे वृत्त योग प्राशिक्षक क्रिस्टीना सेलूसनाए यांनी सांगितले.
प्राणायम, योगामध्ये आपण सूर्याची पूजा केली जाते. टिम टोमकिंस यांनी म्हटले की अत्यंत व्यस्त ठिकाणी अशा प्रकारच्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करणे हे एक आव्हानदायक बाब असते.
महिलांचे प्रमाण जास्त
उपस्थित सहभागींमध्ये महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती. योगासने आणि प्राणायमची महती पाश्चिमात्य देशांनीही जाणली आहे. त्यामुळेच योगासनच्या उपक्रमाला मोठ्या प्रमाणावर गर्दी होती.
पुढील स्लाइडवर पाहा, योगासने करतानाची काही छायाचित्रे..