आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 120 Crore Rupee Private Island Of Greece, Redy For Sale

वेगळ्या जगाची अनुभूती देणारा ग्रीसमधील हा प्रायव्हेट आइसलँड तुम्ही करू शकता खरेदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: 120 कोटी रुपयांमध्ये विकल्या जाणारे ग्रीसचे प्रायव्हेट आइसलँड)
स्वत: एक वेगळे विश्व स्थापित करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. अशआ लोकांसाठी यूनानच्या जवळ 'ट्रिनिटी'चे व्दीप 120 कोटींमध्ये मिळू शकते. यामध्ये एक चर्च, खेळाचे मैदान, दोन्ही बाजूने समुद्र किनार, रेस्तरॉ आणि बदामाचे 350 झाडे आहेत.
13 एकर क्षेत्रात पसरलेल्या या व्दीपमध्ये चार बेडरुमचा बंगला, दोन बेडरुमचा स्टाफ हाउस, एक बीच हाउस आणि 17व्या दशकातील वॉच टॉवर आहे. हिरवळाईने भरलेले या व्दीपमध्ये 30 लोकांच्या राहण्याची क्षमता आहे. मित्र किंवा कुटुंबीयांसमवेत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे.
सुंदर ट्रिनीटी व्दीपच्या मार्केटिंगची जबाबदारी रिजिनोस रिएल्टीकडे आहे. याच्या प्रवक्त्याने सांगितले, की हा व्दीप खरेदी करेल त्याला एका वेगळ्या जगाची अनुभूती येईल. ज्यांना स्वत:चे खासगी आयुष्य जपण्याची सवय असते अशा लोकांसाठी हे ठिकाण चांगले आहे. एथेंसहून येथे पोहचण्यासाठी केवळ दीड तास लागतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा ग्रीसच्या प्रायव्हेट आइसलँडची खास छायाचित्रे...