(अलास्काच्या देनाली नॅशनल पार्कमधील रेड फॉक्स)
जगभरात गेल्या काही दिवसांपासून विविध स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. त्यामध्ये क्विज कॉटेस्टपासून ते स्पोर्ट्स आणि इतर इव्हेंट सामील आहेत. अशीच एक स्पर्धा अलीकडेच, अमेरिकेमध्ये स्मिथसोनियन नॅशनल म्युजिअम ऑफ नॅच्युरल हिस्ट्रीच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर म्युजिअमव्दारा निवडक छायाचित्रात फोटो प्रदर्शनाचे अनावरण करण्यात आले. त्याचे नाव 'वाइल्डरनेस फॉरएव्हर: अमेरिका के जंगल स्थानो की रक्षा के 50 साल' असे ठेवण्यात आले होते.
या प्रदर्शनामध्ये अमेरिकेच्या 109 मिलियन एकरात पसरलेल्या विविध खडकांच्या आणि जंगलांची घेण्यात आलेली छायाचित्रे समील करण्यात आलेली आहेत. खडकांपासून अलास्काच्या टुंडा क्षेत्रात तसेच, मॉसी खडकाच्या जंगलापासून ते पॅसिफिक कोस्टपर्यंत घेण्यात आलेल्या या छायाचित्रांमध्ये जंगलात राहणा-या प्राण्यांचे अनोखे रुप बघायला मिळते. तसेच, काही ठिकाणी जंगलाचे आणि नजरांचे सौंदर्य पाहायला मिळते.
सांगितले जाते, की या प्रदर्शनामध्ये 5000 लोकांनी छायाचित्रे पाठवली होती. परिक्षकांनी त्यामधील 18 छायाचित्रे निवडली आहेत. विविध फोटोग्राफर्सच्या वतीने अमेरिकेच्या क्षेत्रातील शानदार नजारे क्लिक केलेल्या या छायाचित्रांचे प्रदर्शन 2015मध्ये उन्हाळ्यापर्यंत चालणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाह या प्रदर्शनात निवडण्यात आलेली शानदार 17 छायाचित्रे...