आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोदकामात सापडले शीर नसलेला 20 फूटी सापळा, शास्त्रांनी केला राक्षस असल्याचा दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - रशियाच्या कमांडर आयर्लंडवर शास्त्रांना 20 फूटाचा सापळा सापडला आहे. शीर नसलेला आक्राळविक्राळ सापळा पाहून शास्त्रज्ञ चकित झाले. या सापळ्याला 27 फासोळ्या आहेत. सुरुवातीला हा सापळा एखाद्या राक्षसाचा असू शकतो, असा दावा शास्त्रांनी केला होता. मात्र आता या सापळ्याचे सत्य समोर येत आहे.

 

कोणचा आहे हा सापळा?
- शास्त्रज्ञांनी सांगितले की, समुद्र किनाऱ्यावर या सापळ्याचा काही भाग बाहेर आलेला होता. त्यानंतर खोदकाम करून तब्बल आठ तासांनी हा सापळा बाहेर काढण्यास यश आले.
- हे पाहून अंदाज लावल्या जात होता की, ही एखादी समुद्री गाय असावी. या गायीची लांबी 30 फूट, तर वजन 10 टनच्या आसपास असावे. आता अस्तित्व नसलेल्या या प्राण्याला पाहिल्याचा दावा काहींनी केला आहे.

 

शिकार केल्याने झाला नष्ट
- अहवालानुसार हा समुद्री प्राणी नष्ट होण्याचे कारण म्हणजे सतराव्या शतकात या प्राण्याची झालेली शिकार. लांबच्या दौऱ्यावर जातांना या प्राण्याचा शिकार केला जायचा. या प्राण्यापासून तब्बल 33 लोकांचे पोट एक महिन्यापर्यंत भरले जाऊ शकत होते.

 

पुढील स्लाईडवर पाहा - या महाकाय प्राण्याच्या सापळ्याचे फोटो

बातम्या आणखी आहेत...