आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: तारुण्य टिकवण्यासाठी दररोज रक्ताने अंघोळ करते ही तरुणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक 20 वर्षीय तरुणी प्राण्यांच्या रक्ताने अंघोळ करते, जेणेकरून तिला तरुण राहता येईल. प्राण्यांच्या रक्ताने तारुण्य वाढते असे या तरुणीचे म्हणणे आहे. कॅलिफोर्नियामध्ये राहणारी कॅनल नावाची एक तरुणी फ्रिलान्स मॉडेल आणि अभिनेत्री आहे, तिच्या अशा अदावर एक टीव्ही शोसुध्दा बनला आहे. एमटीव्हीच्या रिअॅलिटी शो 'ट्रू लाइफ'मध्ये तिला विचित्र पध्दतीने प्राण्यांच्या रक्ताने अंघोळ करताना दाखवले आहे.
काय म्हणते ही मॉडेल...
कॅनल सांगते, 'मी स्वत:ला अशाप्रकारे तरुण ठेवत आहे, याचा मला खूप आनंद आहे.' कॅनला मानते, की शंभर वर्षांपूर्वी लोक अशाचप्रकारे अंघोळ करायचे आणि स्वत:ला ताजेतवाणे ठेवत होते.
कॅनलची आजी लोइस याविषयी तिला याबाबत पुरावा मागते, परंतु ही तरुणी कोणताच पुरावा देऊ शकत नाही. टीव्ही शोमध्ये कॅनलने सांगितले, 'मला दु:ख आहे, की आजी माझ्या प्रकृतीविषयी चिंतीत असते, परंतु मला रक्ताने अंघोळ करायला आवडते. मी ते थांबवू शकत नाही.' ही मॉडेल जराही पर्वा न करता प्राण्यांच्या रक्ताने अंघोळ करते, असे स्वीकार करते. हा कार्यक्रम अशा लोकांवर आधारित आहे, ज्यांनी कधीच आपले तारुण्य गमवायचे नाहीये. मॉडेल अंघोळीसाठी घराजवळ असलेल्या खाटिकांकडून रक्त खरेदी करते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या मॉडेलचे रक्ताने अंघोळ करतानाचे Photos...
बातम्या आणखी आहेत...