(योग मुद्रामध्ये सील)
इंटरनेटवर पाळीव प्राण्यांची अनेक मजेशीर छायाचित्रे आपण पाहिली असतील. पाळीव प्राण्यांची काही मजेशीर छायाचित्रे ही फोटोशॉपच्या माध्यमातून तयार केली जातात, तर काही छायाचित्रे ही परफेक्ट टायमिंगचा उत्कृष्ट नमुना ठरतात. प्राण्यांच्या विविध हावभावांची काही छायाचित्रे आम्हाला मिळाली आहेत. ही छायाचित्रे पाहून जणू हे प्राणी मनुष्याप्रमाणे योगा करत असल्याचा आपल्याला भास होतो.
यामधील काही छायाचित्रे ही खरीखुरी आहेत, तर काही छायाचित्रे ही फोटोशॉपच्या माध्यमातून बनवली असल्याचे समजते. इंटरनेटवर ही छायाचित्रे व्हायरल झाली आहेत.
ही मजेशीर छायाचित्रे पाहून नक्कीच तुम्हालासुद्धा हसू येईल. जणू हे प्राणी योगाच्या माध्यमातून स्वतःचे आरोग्य सुदृढ करत असल्याचा विचार नक्कीच तुमच्या मनात येईल. यामध्ये काही प्राण्यांची छायाचित्रे ही परफेक्ट टायमिंग असून यामध्ये हे प्राणी योग मुद्रेत बसलेले दिसतात.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा योगा करत असलेल्या प्राण्यांची ही खास छायाचित्रे...