आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2300 वर्षांपूर्वी मौर्य काळात महिला परिधान करायच्या मिनी स्कर्ट आणि क्रॉप टॉप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिक्टोरियन एरामधील एका राणीबरोबर बंगाली महिलांचा PHOTO. - Divya Marathi
व्हिक्टोरियन एरामधील एका राणीबरोबर बंगाली महिलांचा PHOTO.
इंदूर - फॅशनमध्ये असे काहीही नसते जे आधी परिधान केलेले नाही. आजचा लेटेस्ट ट्रेंडही पूर्वीच्या काळाच प्रसिद्ध होता जेव्हा नागरीकरणही झालेले नव्हते. एक फरक नक्की आहे, तो म्हणजे स्त्रियांचा सन्मान तेव्हा कपडे पाहून केला जात नव्हता. मौर्यकाळात म्हणजे इसवीसन पूर्व 300 वर्षांपूर्वी महिला क्रॉप टॉप सारखे बस्टियर आणि मिनी स्कर्टसारखे सुती कापड गुंडाळायच्या. पुरुषही तेच परिधान करायचे. 

पुरुष शक्यतो टॉपलेस राहायते. कपड्यांच्या मॉडर्निटीचा विचार केला तर हजारो वर्षांपूर्वीचे लोक आजच्या तुलनेत फार मॉडर्न होते. अनेक आदिवासी जमातींमध्ये तर फक्त झाडाच्या पानांनी शरीर झाकले जायचे. फॅशनच्या इतिहासाचा विचार करता तो अत्यंत रंजक असल्याचे समोर येते. प्रत्येक शतकामध्ये वेगळी फॅशन असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. फक्त त्यावेळी फॅशन हा शब्द प्रचलित नव्हता. पण लोकांच्या कपडे परिधान करण्याची, दागिन्यांची एक विशिष्ट पद्धत होती आणि तीच तर फॅशन असते. 

राजा सोन्याचे मुकूट परिधान करायचे, प्रजेतील लोक म्हशींच्या शिंगांचे मुकूट बनवायचे 
राजांच्या काळात संपूर्ण राज्यासाठी राजा-राणी हेच सर्वस्व असायचे. कपड्यांचा विचार करता लोक त्यांनाच कॉपी करायचे. त्या काळात कोणीही उघडे डोके घेऊन घराबाहेर पडत नव्हते. फक्त ज्यांच्या घरात एखाद्याचा मृत्यू झालेला असेल, तेच असे निघायचे. डोक्यावरूल मुकूट सन्मानाचे चिन्हं असायचे. प्रजेला सोने खरेदी करणे शक्य नव्हते, त्यामुळे ते म्हशी किंवा इतर प्राण्यांच्या शिंगापासून तयार केलेले मुकूट परिधान करायचे. प्रजेपेक्षा वेगळे दिसण्यासाठी राजा वारंवार त्याचा लूक बदलत राहायचा. प्रजाही त्याला लूक पाहून लूक बदलत राहत असे. 

व्हिकिटोरियन रुलर्सना आवडत नव्हते महिलांचे टॉपलेस राहणे 
बंगालमध्ये व्हिक्टोरियन राज्य होते, त्या काळात महिला सुती कापड शरिरावर गुंडाळायच्या. त्यावेळी ब्लाऊज नव्हते. स्त्रियां फक्त साड्या परिधान करायच्या. व्हिक्टोरियन रुलर्सला हे आवडत नव्हते. रवींद्रनाथ टागोर यांची वहिणी जनकनंदिनी देवी यांनाही सोशल क्लब्समध्ये प्रवेश दिला जात नव्हता. त्याचे कारणही हेच होते. महिलांनी कमरेवरील शरीर झाकायला हवे असा नियम त्यांनी तयार केला होता. त्यावेळी त्यांनी व्हिक्टोरियन काळातील गाऊन्सच्या वरचा भाग पाहून ब्लाऊज तयार करणे आणि ते परिधान करणे सुरू केले. त्याला फुल स्लिव्हज असायचे. 
बातम्या आणखी आहेत...