अमेरिकेतील इलिनॉय येथील एका शाळेतील वर्गात तब्बल 24 जुळ्या मुलांच्या जोड्या आहेत. योगायोगानेच हा विक्रम झाल्यामुळे हायक्रेस्ट मिडल स्कूलचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवण्यासाठी पाठवण्यात आले आहे.
यापूर्वी अनेक शाळांमध्ये 16 जुळ्यांच्या जोड्या होत्या. अनेकदा तर ही मुले एकसारखे कपडे घालून येतात, तेव्हा शिक्षकांनाही त्यांना ओळखणे कठीण जाते.